WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

पुढील पिढीसाठी जलस्त्रोत बळकटीकरण करणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी – आनंदा शिंदे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

जलस्त्रोत व्यवस्थापन हा जल जीवन मिशनचा एक महत्त्वाचा भाग

राशिवडे – प्रभावी पाणी व्यवस्थापनासाठी जलस्रोतांची सुरक्षितता व शाश्वतता एकत्रितपणे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरक्षितता पाण्याची तात्काळ उपलब्धता सुनिश्चित करते तर शाश्वतता ही हमी देते की हे स्त्रोत भविष्यातील पिढ्यांसाठी कार्यरत राहतील. पुढील पिढीसाठी जलस्त्रोत बळकटीकरण करणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आनंदा शिंदे यांनी मनवेल बारदेस्कर एज्युकेशन सोसायटी, स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती राधानगरी यांच्या वतीने राशिवडे बुद्रुक येते आयोजित केलेल्या जलस्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण कार्यशाळेत केले. अध्यक्षस्थानी सरपंच संजिवनी पाटील होत्या. 

जलस्त्रोत व्यवस्थापन हा जल जीवन मिशनचा एक महत्त्वाचा भाग असून त्याचे बळकटीकरण करणे व शाश्वतता वाढवणे साठी व्यवस्थापनाने गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं आहे. यासाठी गावातील अनुभवी शेतकऱ्यांचा व लोकांचा सहभाग घ्यावा असेही आव्हान ही शिंदे यांनी केले. या दोन दिवशीय कार्यशाळेमध्ये पाण्याचे स्त्रोत आणि त्यांचे महत्त्व, स्त्रोत शाश्वतता, स्त्रोत व्यवस्थापनाची सद्यस्थिती, समुदाय आधारित स्त्रोत बळकटीकरण, भूजल पुनर्भरणाचे महत्व, भूजल पुनर्भरणाच्या पद्धती,जलचक्र आणि भूपृष्ठावरील पाणी, भारतातील जलधोरण,महाराष्ट्र राज्य जलधोरण, महाराष्ट्रातील प्रमुख पाणी योजना, भूजल संशोधनाच्या पद्धती आणि तंत्रे, भूजल मोजण्याच्या पद्धती, भूजल डेटा संकलनाच्या प्रमुख पद्धती, प्रजन्यमापक प्रणाली व त्याचे महत्त्व,पाण्याचे अंदाजपत्रक प्रक्रिया, भूजल पुनर्भरणाचे महत्व, भूजल पुनर्भरणाच्या पद्धती आणि तंत्रे, भूजल पुनर्भरणाचे फायदे, पर्यवेक्षण आणि गुणवत्ता नियंत्रण, भूजल पुनर्भरणासाठी वापरली जाणारी ड्रेनेज लाईन तंत्रे ई विषयावर अजय देशमुख भिकाजी कांबळे अनिल पाटील राजेश इनामदार सारिका पाटील कनिष्ठ अभियंता सर्जेराव काशीद पाणी गुणवत्ता निरीक्षक विजय सावंत यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत बारा गावातील 60 लोकांचा समावेश होता.या कार्यशाळेसाठी गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील,जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कार्यक्रमाधिकारी माधुरी परीट, देवराज बारदेस्कर, यांचे मार्गदर्शन लाभले. सर्जेराव पाटील काशिनाथ कांबळे मुकुंद डोंगरे यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले. यावेळी येळवडे सरपंच ओंकार पाटोळे कोदवडे सरपंच मंगल पाटील मोहडे सरपंच सुनीता पाटील,शिरगाव उपसरपंच अंकुश गुरव,उपसरपंच अजिंक्य गोनुगडे, सर्जेराव गोंगाणे, प्रकाश पोवार, निवास डकरे, सुरेश कुसाळे, आनंदराव पाटील धनाजी पाटील आनंदा चौगले यांच्यासह इतर गावातील सरपंच उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक रणविजय कांबळे यांनी प्रास्ताविक केले आभार महादेव कामतकर यांनी मानले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.