WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने ‘चिक्केवाडी’ पुन्हा उजळली

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

सहा वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी १० कि.मी. अंतरातील १५६ पोलची केली पाहणी

कोल्हापूर : ‘चिक्केवाडी’ (ता. भुदरगड) येथील वीज पुरवठा पावसामुळे गेली काही दिवस बंद होता. घनदाट जंगलातील १० किलोमीटर मध्ये असलेल्या १५६ पोलची पाहणी करण्यात पाऊस व वारा यामुळे अनेक अडचणी येत होत्या. महावितरणच्या ११ जिगरबाज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहा वीज ग्राहकांचा वीज पुरवठा दोन दिवस अथक मेहनत घेत पूर्ववत केला आहे. महावितरणच्या या कामाकरता ‘चिक्केवाडी’ ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 

                महावितरणच्या गारगोटी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या शाखा कार्यालय पाटगाव मधील ‘चिक्केवाडी’ या वाडीला ११ केव्ही ‘पाटगाव’ या उच्चदाब वाहिनीवरील ‘चिक्केवाडी’ या रोहित्रावरून विज पुरवठा होतो. ‘चिक्केवाडी’ला वीज पुरवठा करणारी ही वाहिनी तांबाळे ते भटवाडी व भटवाडी ते ‘चिकेवाडी’ अशी एकूण ३२ किलोमीटर अंतरावरून जाते. यापैकी  भटवाडी ते ‘चिकेवाडी’ या १० कि.मी. अंतरात एकूण १५६ विद्युत पोल आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्याकरता १० किलोमीटर अंतरातील १५६ पोलची पाहणी महावितरणच्या या टीमने काही दिवस सलग करत होते. या पाहणीत दोन पिन इन्सुलेटर नादुरुस्त सापडले ते बदलण्यात आले आहेत.

  या होत्या अडचणी

‘चिक्केवाडी’चा वीजपुरवठा सुरळीत करताना कर्मचाऱ्यांना अनेक नैसर्गिक अडचणींचा सामना करावा लागला. भटवाडी येथे असलेला ओढा ही पहिली व प्रमुख अडचण होती. पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने ओढा पार करून पुढे जाणे जिकीरीचे होते. सतत पडणारा पाऊस, वाहणारा वारा याचाही सामना कर्मचाऱ्यांना करावा लागला. भटवाडी ते ‘चिक्केवाडी’ हा १० किलोमीटरचा पायवाट रस्ता अत्यंत निसरडा होता. हा संपूर्ण जंगल परिसर असल्याने मोबाईल नेटवर्क ही नव्हते त्यामुळे वीज वाहिनी चाचणी घेण्यासाठी संपर्क साधण्यात देखील अडचण येत होती. या सर्व अडचणींवर मात करत व वन विभागाचे नियम पळून महावितरण कर्मचाऱ्यांनी ही मोहीम फत्ते केली.

ग्राहकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून कामाचा क्षीण गेला

वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ‘चिक्केवाडी’ ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून केलेल्या कामाचा क्षीण काही क्षणात नाहीसा झाला, अशा भावना शाखा अभियंता अक्षय नाडे यांनी व्यक्त केल्या. या कामात पांडुरंग शिंदे, मंगेश आदर्शे, समिंदर साठे, सुहास पाटील, नितीन कांबळे, किरण स्वामी, पंढरीनाथ भालेकर, सुशांत पाटील, अक्षय ढोकरे, विक्रम राऊळ या कर्मचाऱ्यांनी महत्वाची कामगिरी बजावली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.