विनायक जितकर
नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी सावरकर गौरव यात्रा
कोल्हापूर प्रतिनिधी : भाजपाच्या वतीनं कोल्हापुरात सावरकर गौरव यात्रा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचं स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. यातून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली. सावरकर गौरव यात्रेचं आयोजन करण्याबाबत आज भाजपा जिल्हा कार्यालयामध्ये भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली.
भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव यांनी मंगळवारी दुपारी 4 वाजता मिरजकर तिकटी – बिनखांबी गणेश मंदिर – महाद्वार रोड – पापाची तिकटी – छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी या गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी अशोक देसाई, विजय जाधव, हेंमत आराध्ये, चंद्रकांत घाटगे, अमोल पालोजी, सचिन तोडकर, विजय खाडे, अजित ठाणेकर, विजय आगरवाल, गायत्री राऊत, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.