संत नामदेव महाराज यांचे ७५३ वे जयंती वर्ष व ६७३ वे समाधी वर्ष निमित्त…
पुणे – नामदेव शिंपी समाज युवक संघ शिरूर तालुका आयोजित संत नामदेव महाराज यांचे ७५३ वे जयंती वर्ष व ६७३ वे समाधी वर्ष निमित्त संत नामदेव महाराज जीवन चरित्र मार्गदर्शन तसेच शिरूर तालुक्यातील युवक समाज बांधवांचे एकत्रिकरण चर्चासत्र रविवार दिनांक ४ जून रोजी तळेगाव ढमढेरे येथील बाजार पेठेतील संत नामदेव विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून संत नामदेव महाराज यांचे थेट सतरावे वंशज निवृत्ती महाराज नामदास, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद घोडगांगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुधिरभाऊ ढमढेरे व मान्यवर उपस्थित होते यावेळी संत नामदेवांच्या जीवन चरित्र यावरती संत नामदेव महाराज यांचे वंशजांनी मार्गदर्शन केले सर्वांचे स्वागत विशाल बुलबूले यांनी केले नामदेव शिंपी समाज युवक संघाचे अध्यक्ष सिध्देश हिरवे यांनी आपले विचार मांडले प्रास्ताविक अरुणा मेटे यांनी केले मनोगत प्रदीप मेटे, युवक व महिला सदस्य यांनी व्यक्त केले आभार सचिन मेटे अक्षय खोले यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश काळे यांनी केले.
यावेळी अक्षय नेवासकर, सचिन मेटे, अक्षय खोले, निलेश काळे, स्वप्नील नेवासकर, अनुराग मेटे, विशाल बुलबुले, मनीष मेटे, संकेत काळे, अक्षय खोले, प्रदीप मेटे, भाग्येश खोले, राजेंद्र मेटे, सौरभ हिरवे, संतोष नाझरे, सुभाष मेटे, राजेंद्र काळे, सुरेश खोले, धनंजय हिरवे, बोरकर, शित्रे, बोत्रे परिवार आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले, तसेच अनेक समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.