विनायक जितकर
भविष्यात गोकुळ प्रधान कार्यालय व चिलिंग सेंटर्सच्या आवारात मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक व इतर वनस्पतीची लागवड…
कोल्हापूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरर्स (इंडिया) कोल्हापूर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने संघाच्या गोकुळ शिरगांव येथील प्रधान कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपन करण्यात आले. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ तसेच इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरर्सचे पदाधिकारी यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, “५ जून जागतिक पर्यावरण दिवस हा पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस प्लास्टिक प्रदूषणावरील उपाय या विषयावर साजरा करण्यात येणार आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. वातावरणात अनियमितता आली आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. प्लास्टिकच्या वस्तूच्या ऐवजी इको फ्रेंडली वस्तूंचा आपल्या दैनदिन जीवनामध्ये वापर करणे फार महत्त्वाचे आहे. चेअरमन डोंगळे म्हणाले, “गोकुळने नेहमीच पर्यावरणपूरक धोरण अवलंबले आहे. भविष्यात गोकुळ प्रधान कार्यालय व चिलिंग सेंटर्सच्या आवारात मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक व इतर वनस्पतीची लागवड करण्यात येईल. जशी गोकुळने दुग्ध व्यवसायामध्ये धवलक्रांती केली आहे. तशीच गोकुळ भविष्यात जनावरांच्या आयुर्वेदिक उपचारासाठी लागणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पती लागवडीच्या माध्यमातून हरितक्रांती करेल.”
यावेळी संचालक अजित नरके, प्रकाश पाटील, यांनी मनोगत व्यक्त केली. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरर्सचे सेक्रेटरी संजय खोल यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक सिव्हिल प्रकाश अडनाईक यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संघाचे संचालक शशिकांत पाटील, संभाजी पाटील, गोकुळचे अधिकारी डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक संगणक ए. एन. जोशी, व्यवस्थापक प्रशासन डी.के.पाटील,हिमांशू कापडिया, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरर्सचे एस. एस. खटकाळे, श्रीकांत भोसले, विष्णू सानप, संभाजी गुरव उपस्थित होते.