विनायक जितकर
छत्रपती शिवरायांना अभिवादन करताना डॉ. संजय डी. पाटील, डॉ. ए. के. गुप्ता, प्राध्यापक व विध्यार्थी.
कसबा बावडा – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवारी शिवस्वराज्य दिन उत्सहात साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. हा दिवस संपूर्ण राज्यात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील आणि कार्यकारी संचालक संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते महारांज्यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, छत्रपती शिवराय हे आदर्श राजा व उत्तम प्रशासक होते. त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य व त्यांची युद्धनीती याचा जगभरात अभ्यास केला जातो. त्यांचे जीवन व कार्य सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. डॉ. गुप्ता म्हणाले, शिवाजी महाराज हे सर्वांचे स्फूर्ती स्थान आहेत. त्यांच्या नावाचा जयघोष होताच प्रचंड उत्साह निर्माण होतो. त्यांचे विचार जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आचरणात आणणे गरजेचे आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, जिमखाना प्रमुख डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. आर ए पाटील, एनएसएस समनव्यक प्रा योगेश चौगुले यांच्यासह सर्व विभाग प्रमुख , प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थितीत होते.