हिंदुत्ववादी संघटनांचा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या…
कोल्हापूर : आक्षेपर्य स्टेटस ठेवल्या प्रकरणी कोल्हापुरात तणावपूर्ण वातावरण आहे. हिंदुत्ववादी संघटनानी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर येतं ठिय्या केला त्यानंतर शहरात आक्रमक झालेल्या जमावाने जोरदार घोषणाबाजी करत टाऊन हॉल परिसरातील हातगाड्यांवर दगडफेक केली.
कोल्हापुरातील एका समाजकंटकाने औरंगजेबाचा आक्षेपर्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी कोल्हापुरात वातावरण तंग झाले होते. संबंधित समाजकंटकाला अटक करावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर एकत्र आले होते. आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजवाटा तैनात करण्यात आला होता.
यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. ज्या समाजकंटकाने हा स्टेटस ठेवला त्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी यावेळी केली. पोलिसांनी यावेळी जमावाला पांगवले. दरम्यान अटक केलेल्या दोघांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी यासाठी उद्या कोल्हापूर बंद ची हाक दिलेली आहे.