चंदगड: मजरे कारवे (ता.चंदगड) येथील राष्ट्रीय खेळाडू संकेत प्रभाकर चांदीलकर याने नुकताच ऊजीरे (धर्मस्थळ) येथे एसडीएम महाविद्यालयात कर्नाटक राज्यस्तरीय वेटल्पिटींग स्पर्धेत १०२ किलो वजनी गटात एकूण २३० किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळविले. तामीळनाडू येथे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल राज्यात पहिले तर भारतात तिसरे
संकेत यांने सुरुवातीपासूनच मेहनत घेत राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा मानस केला होता. नुकताच कर्नाटक राज्य येथील राज्यस्तरीय सुवर्णपदकाला गवसणी घालत राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळविल्याने त्याचे विशेष अभिनंदन होत आहे. त्याला वडील प्रभाकर चांदीलकर व आई प्रभावती यांचे प्रोत्साहन तर प्रशिक्षक सदानंद मल्लशेट्टी, ज्योती काॅलेजचे एस. के. पाटील, पी. वाय. बोकडे व प्रा. सूरज हारकारे यांचे मार्गदर्शन केले.