कुंभोज- विनोद शिंगे
हातकलंगले तालुक्यातील नरंदे येथील ग्रामपंचायतीसाठी श्री नागनाथ ग्रामविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात करण्यात आला, 652 प्लॉटचा उतारा सर्वसामान्य नागरिकांच्या हातात नावे करुन देणार हा श्री नागनाथ ग्रामविकास आघाडीचा अजंठा असून सत्ता मिळाल्यापासून एक वर्षाच्या आत 652 प्लॉट धारकांना त्यांच्या नावाचा प्लॉटचा उतारा त्यांच्या हातात दिला जाईल असे उद्गार संजीवनी पब्लिक स्कूलचे संस्थापक प्रकाश भोसले यांनी काढले.
चाळीस वर्षात ग्रामपंचायतील खुर्ची बदलायची झाली नाही ते विकास काय करणारः प्रविण जनगोंडा
ते नरंदे तालुका हातकलंगले येथे श्री नागनाथ ग्रामविकास आघाडीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी नागनाथ मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सर्जेराव भंडारी होते. यावेळी विरोधक केवळ आम्ही मंजूर केलेल्या विकास कामे आपल्या नावावरती मांडत असून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. परिणामी विरोधक वैयक्तिक पातळीवर अनेक गोष्टीत विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत या सर्व गोष्टीला कंटाळून माजी आमदार महादेवरावजी महाडिक यांच्या नेतृत्वाखाली नरंदे ग्रामपंचायतीसाठी नेते सजेराव भंडारी व राजकुमार भोसले गट एकवटले असून त्या दोघांच्या युतीमुळे श्री नागनाथ ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चित आहे,
पॅनल मधील सर्वच उमेदवार अभ्यासू व शिकाऊ असल्याने नरंदे गावच्या सर्वांगीण विकासासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी बोलताना व्यक्त केला.
यावेळी नागनाथ मंदिरात एनआर भोसले, प्रकाश भोसले राजू भोसले,सर्जेराव भंडारी, विलास भंडारी सिद्ध नरबळ, मदन भंडारी, नामदेव पाटील, सिकंदर मुलांनी,स्वप्नील भंडारी, नामदेव साळुंखे, आनंदराव पाटील ,तुकाराम अनुसे ,शैलेश हरोले, बाळासो कदम, बबन भंडारी, महादेव माने, बबन खोत, जगन्नाथ खोत आदी मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
सर्व उपस्थित मान्यवरांनी श्री नागनाथ ग्रामविकास आघाडीला बहुमताने विजयी करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाचे स्वागत लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवार पूजा कुरणे यांनी केले यावेळी श्री नागनाथ ग्रामविकास आघाडीचे सर्व उमेदवार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.