WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

समृद्धी महामार्गावरील अपघातप्रश्नी ईडी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – नाना पटोले

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

समृद्धी महामार्गाचे स्वतंत्र ऑडीट करुन सर्व दोष दूर करा. ५४ हजार कोटी रुपये खर्चून जनतेच्या माथी मृत्युचा महामार्ग.

मुंबई – नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग मोठा गाजावाजा करुन ईडी सरकारने घाईघाईत पंतप्रधानांच्या हस्ते खुला केला. हा महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघात होत आहेत. या महामार्गाबद्दल अनेक तक्रारीसुद्धा येत आहेत पण शिंदे फडणवीस सरकार त्याची दखल घेताना दिसत नाही. बुलढाण्याजवळ खाजगी बसला अपघात होऊन २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला, हा अपघात नसून सरकारी अनास्थेचे बळी आहेत. म्हणून शिंदे फडणवीस सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

समृद्धी महामार्गावर भिषण अपघात होऊन २६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे. अपघातातील मृत्यांना श्रद्धांजली अर्पण करुन नाना पटोले यांनी ईडी सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, या महामार्गासाठी तब्बल ५४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आपण मोठे दिव्य काम केल्याचा डांगोरा हे सरकार पिटत असते पण हा महामार्ग खुला झाल्यापासून मागील सहा महिन्यात या महामार्गावर जवळपास ३०० अपघात झाले आहेत. प्रत्येक अपघातात कोणाचा ना कोणाचा मृत्यू होत आहे. आजचा अपघात तर अत्यंत भिषण होता, २६ जणांचा मृत्यू होतो यातूनच या अपघाताची तीव्रता किती भीषण आहे हे दिसून येते. समृद्धी महागामार्गातून काही मोजक्या लोकांचीच समृद्धी झाली आणि महामार्ग मात्र मृत्युचा सापळा बनला आहे. या महामार्गावर सुरक्षेच्यादृष्टीने अजून खूप करावे लागणार आहे. या महामार्गावरील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. सरकारने या रस्त्याचे विशेष ऑडीट केले पाहिजे तरच असे दुर्दैवी बळी जाणार नाहीत पण सरकारला फक्त जाहीरातबाजी करुन श्रेय लाटण्यातच धन्यता वाटते. समृद्धी महामार्गाच्या आराखड्यासाठी सुद्धा तज्ञांच्या विशेष पथकाला हजारो कोटी रुपये दिले आहेत. पण अपघाताचे प्रमाण पाहता रस्ते बांधणी करताना फारशी काळजी घेतल्याचे दिसत नाही.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आणि एक्स्प्रेस वे साठी साठी निश्चित केलेले नियम पाळलेले दिसत नाहीत. रोड हिप्नॅासीसमुळे अपघात होतात असे काही काही तज्ञांनी सांगितले आहे त्यावर काही उपाय केलेले नाहीत. रस्त्यावर ठरावीक अंतरावर चहा पाणी जेवण मिळणारे हॅाटेल आणि स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. याचा त्रास वाहनचालकांना आणि प्रवाशांना होतो तसेच रोड हिप्नॅासीस च्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या महामार्गावरील अपघात इतर महामार्गापेक्षा कमी आहेत अशा पद्धतीचा दावा सरकार करत असते पण हे सर्व चुकीचे असून मुळात ईडी सरकार आपल्या चुका मान्यच करत नाही. १२ तासात नागपूर ते मुंबई पोहचू शकतो असा महामार्ग आपण बनवला यातच ते मग्न आहेत. आतातरी सरकारने डोळे उघडावेत व समृद्धी महामार्गावरचे अपघात होऊ नयेत यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना कराव्यात. पावसाळी अधिवेशनात आम्ही सरकारला या प्रश्नी जाब विचारणार आहोतच पण ईडी सरकार आजच्या अपघातातून काही बोध घ्यावा तात्काळ उपाय करावेत, असेही नाना पटोले म्हणाले.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी