WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

रेल्वेप्रवासी महिलां सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात – नीलमताई गोऱ्हे 

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

फटका गॅग वर नियंत्रण आणल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले.

मुंबई – महिलांना रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षित वातावरण असावे, अनुचित घटना होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती मा. ना. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले. रेल्वेमधील प्रवासी महिलांची सुरक्षा या विषयाच्या अनुषंगाने आज विधानभवनातील सभाकक्षात संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी  या बैठकीत मागील बैठकात दिलेल्या निर्देशावर कोणती अंमलबजावणी झाली याची माहिती घेतली. त्याप्रसंगी डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी पुढील निर्देश दिले.

ट्रेनमध्ये क्युआर कोड सिस्टम असावी,सुरक्षा गार्ड ची असलेली कमतरता पूर्ण करणेबाबत पाठपुरावा करावा, निर्भया फंड रेल्वे पोलिस यांना उपलब्ध करावा. शासकीय पीडितासाठी त्यांच्या शारिरिक  उपचारानंतरही उपलब्ध झाल्यास मनोधैर्य वाढवण्यास मदत होईल,तसेच बेकायदेशीर व्यक्ती,गर्दुले लोकांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, सामाजिक संस्थाच्या प्रश्नाबाबत काय अंमलबजावणी केली ती त्यांना बैठकीत समजावे म्हणून अहवाल तयार करावा, दक्षता समिती महिला व महिला सुरक्षा कर्मचारी यांचे वॉट्स अप ग्रुप करावेत. तसेच विशिष्ट वेळेनुसार स्वयंसेवी प्रवासी महिलांचे  वॉट्स अप ग्रुप करावेत. दक्षता समिती सदस्याच्या लोकेशनबाबत डैशबोर्ड तयार करावेत,मनोधैर्य योजनेचे प्रस्ताव तयार करावा. स्ननदा मातांसाठी हिरकणी कक्ष रेलवे-स्टेशनवर करावा. महिलांचे डब्यामध्ये ऑटोमॅटिक सेनेटरी नॅपकीन मशीन आणि चेंजिंग रूम असावी. रेल्वे स्टेशन व रेल्वेतील सीसी टिव्हिचे  ऑनलाईन मानिटरिंग व्हावे,असे निर्देश  दिले. महिला प्रतिनिधींनी  डार्क स्पॉट्स आणि सिग्नल ला अपघात घडतात त्याबाबत सूचना केल्या त्याबाबत मदत करावी, तसेच एस्केलेटर चढत असताना साध्यापायऱ्या विनाआधार असतील त्या दुरुस्त कराव्या या संबंधी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

रेल्वे पोलिसांचे संबंधित प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी तातडीने  सहकार्य करावे असे निर्देश  महाराष्ट्र गृहविभाग  प्रधान सचिव डॉ प्रज्ञा सरवदे  यांना दिले तसेच रेल्वे प्रवाशांचा फटका  मारून दुखापत व लुट करणाऱ्या  फटका गॅगवर नियंत्रण  आणल्याबद्दल रेल्वे  पोलीसाचे अभिनंदनही केले. रेल्वेमधील  प्रवासी महिलांची सुरक्षा या  विषयाच्या अनुषंगाने मा.उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी  १८ जून, २०१९, रोजी (ठाणे -कळवा स्थानकादरम्यान धावत्या लोकलच्या महिला डब्यावर दारुची रिकामी बाटली फेकल्याने दोन महिला प्रवासी जखमी झाल्याबाबत)  १३ नोव्हेंबर, २०१९, ७ जुलै, २०२१ रोजी रेल्वे मधील महिला सुरक्षीततेबाबत बैठका घेतल्या होत्या. तसेच, दि. १५ जून, २०२३ रोजी मस्जीद बंदर जवळ धावत्या लोकलमध्ये झालेल्या अत्याचाराबाबत बैठका घेतल्या होत्या.

या विषयावर निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीची माहिती घेण्यात आली या बैठकीस  श्री. प्रधान सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई डॉ. प्रज्ञा सरवदे  अतिरिक्त पोलिस महासंचालक रेल्वे सुरक्षा, मुंबई डॉ शिसवे पोलीस आयुक्त, (रेल्वे) मुंबई श्री शुक्ला महाव्यवस्थापक मध्य रेल्वे,मुंबई मा विभागीय रेल्वे व्यवस्थापक, PCOM (Principal Chief Operation Manager), Responsible person for the Crime in running Train उपस्थित होते, तसेच महिला दक्षता समितीच्या व सामाजिक संस्थांच्या महिला प्रतिनिधीची उपस्थित होत्या.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.