POSITIVVE WATCH- पाेलिसाने गाडी पळविली…थेट हाँस्पिटल गाठले आणि! पुढे वाचा सविस्तर..

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अनिकेत बिराडे– REPORTER FRIEND

वर्दीतला पोलीस म्हटलं की नेहमीच सर्वसामान्यांना तसेच वाहनचालकांना भिती वाटते. ट्रँफिक पोलिसांना पाहिल तर आणखीनच तारांबळ उडते हेही नक्कीच. कधी कधी तर पोलिसांना आपण अनेकदा बडबडतो. विनाकारण पोलीस त्रास देतो असे पुटपुटत असतो. पण हेच पोलीस अनेकदा दैवत बनतात, असेही अनेकांना अनेक अनुभव येत असतात. असाच अनुभव कोल्हापुरमधील एका कुटुंबाला आलाय. वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार यांनी वेळेचे महत्व व परिस्थितीचे गांभिर्य ओळखून एका कुटुंबातील कर्ता पुरुषाला जीवदान देण्याच बहुमूल्य कार्य केले आहे. त्यामुळे हे वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार नक्कीच कौतुकास्पद ठरले असून, त्यांचा व वर्दीचा समाजमनात आणखीनच आदर वाढलाय.

बाबासाहेब कोळेकर, पोलीस हवालदार (बक्कल नंबर 434 वाहतूक शाखा कोल्हापूर) असे त्यांचे नाव. बुधवारी

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
बाबासाहेब काेळेकर(वाहतूक शाखा) एक नवा आदर्श.. एक देवदूत

सायंकाळी सात वाजता जणू काही ते देवदूतच बनले. वर्दीतला देव माणूस काय असतो. याचीच प्रचिती कोल्हापूर शहरातील तावडे हाँटेल नजीक अनेकांना आली.  शहर वाहतूकीचे कोळेकर हे बुधवारी आपल्या कर्तव्यावर कार्यरत होते. त्यांनी आजपर्यंत जिथे जिथे आपले कर्तव्य पार पाडले आहे, तेथे नेहमीच आपल्या चाणाक्ष नजरेने अनेकांना कायद्याचे पालन कसे करायचे याचेच ज्ञान दिले आहे. वेळप्रसंगी कायद्याचा धाक दाखवित कारवाई देखील केली आहे. परंतु परिस्थितीचे भान ठेवत नेहमीच त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिक व एकनिष्ठ पार पाडत सामाजिक भानही जपले आहे. असाच प्रसंग बुधवारी कोळेकर यांच्यासमोर आला.

दिलदारपणा! देणगीतून झाली लॅब…४० विद्यार्थी करू शकतील प्रात्यक्षिक;फातरफेकर कुटुंबियांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम

तावडे हाँटेल येथून एका मारुती कारमधून एक कुटुंब येत असता, अचानक ट्रँफिक व्यवस्था कोलमडली. चारीबाजून वाहने अडकून पडले. नेमकं याचवेळी गाडीतून एका महिलेचा ओरडण्याचाही आवाज आला. इतक्यात कर्तव्यावर असलेले कोळेकरही वाहतूकीला दिशा देत, मार्ग काढत तेथे आले. त्यांनी पाहिलं की, मारुती कारमध्ये चालक कोणतीही हालचाल करत नाहीय.. त्यांना घाम आलाय. कार पुढे- मागे घेता येत नाहीय. अखेर अनेक वर्षाचा अनुभव व परिस्थितीचे गांभिर्य ओळखून, सर्वांनी मिळून ती कार तत्काळ बाजूला घेतली. यामध्ये कार चालक विलास शंकर मुळीक (रा. क्रशर चौक,कोल्हापूर) हे स्टिअरिंग धरून चुपचाप बसले होते. त्यांची हालचाल बंद झालेली होती. त्यांच्या डोळ्यास अंधारी आली होती. ते गाडी चालविण्याच्या की बाजूला घेण्याच्या अजिबात मनस्थितीत नव्हते. तशी स्थितीही नव्हती. परिणामी,  यामुळे कोळेकर यांना यांच्या शारिरीक स्थिती काहीतरी बिघाड झालाय हे लक्षात आले. त्यांनी तत्काळ गाडीतील महिलांना यांना विचारात घेऊन. ही कार अन्य कोणी चालवू शकते का? अशी विचारणा केली. परंतु, तसे चालविण्यासारखे तेथे कोणीच नव्हते.

धबधबा पाहिला… दहा हजार लागले भरायला!

आजच निर्णय घ्या.. दिशाला जाँईन व्हा.. करीअर करा

अशावेळी एका बाजूला कर्तव्य व दुसऱ्या बाजूला माणुसकी जपणे, हे कोडे होते. अमूल्य जीवाचे रक्षण करणे हे देखिल पोलिसांचे प्राथमिक कर्तव्य आहे. याची जाण ठेवून त्यांनी तत्काळ संबंधित महिलेची परवानगी घेत, त्या कारचे स्टेअरींग हाती घेत, त्यांचे रक्षणकर्ता बनले. व क्षणाचाही विलंब न करता, जसा मार्ग निघेल. जितके तातडीने हाँस्पिटलच्या दिशेने मार्गस्थ होता होईल तितक्या जलद गतीने त्यांनी वेग धरला. तोपर्यंत संबंधित महिलेने अँस्टर आधार येथे त्यांचे फँमीला डाँक्टर असल्याचे समजताच. अवघ्या काही वेळेतच बाबासो कोळेकर यांनी विनाकारण दुसऱ्याच्या हाती कार देऊन आणखी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेत, अखेर अँस्टर आधार गाठले. 

रॅम्बो नि पाेलीस एकत्र आले नि शाेधला चाेर.. पहा काेण हा रँम्बाे

प्रवेश घ्यायचा तर दिशा मध्येच..

अवघ्या 20 मिनिटातच Aster आधार कार चालक विलास मुळीक यांना दाखल करून त्यांच्या तत्काळ उपचार सुरु झाले आणि अखेर त्यांच्या जीवावर बेतलेला प्रसंग टळला. त्यांची शुगर कमी झाली हाेती. त्यांना त्यामुळे अचानक चक्कर मारायला लागली हाेती. ह्यदयावर देखिल काही अंशी परिणाम हाेण्यास सुरुवात झाली हाेती.  परंतु, डाँक्टरांनी वेळीच उपचार करून  विलास मुळीक यांना बरे केले. यावेळी डाँक्टरही म्हणाले. अगदी वेळेत आणलं म्हणून तत्काळ उचपार करून वेळीच मुळीक यांच्यावर सुधारणा झाली.   वर्दीतला देवमाणूस… बाबासाहेब कोळेकर हे देवदूत बनून आल्याने वेळीच उपचाराची प्रक्रीया डाँक्टरांना करता आली. त्यांचे नातेवाईक देखील त्या दरम्यान, हॉस्पिटलमधे दाखल झाले. पोलीस हवालदार कोळेकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानून ” तुम्ही देवा सारखे धावून आलात, तुम्ही खाकी वर्दीतील देव माणूस आहात “असे उद्गार त्यांनी काढले.

काही  वेळा नंतर कोळेकर हे पुन्हा त्यांच्या नेमलेल्या पॉईंटवर कर्तव्यावर हजर झाले. पोलीस हवालदार कोळेकर यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी जपत, एक नवा आदर्श पोलीस यंत्रणेत व समाजात दाखवून दिला.. कर्तव्याबरोबरच सामाजिक जाण, माणुसकी व माणसाचा अमूल्य जीव देखिल महत्वाचा आहे. हेच या कर्तव्यातून दाखवून दिला. पोलीस हा कोणत्याही कामासाठी सदैव तत्पर असतो हेच या घटनेतून दाखवून दिलेले आहे. त्यांच्या या कृतीने पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात निश्चितच उंचावलेली आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस यंत्रणा, सहकारी व सर्वसामान्य जनतेतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. या घटनेतून बाबासाहेब कोळेकर यांच्यातील देवदूत अनेकांनी पाहिला.

बाबासाहेब काेळेकर यांच्या या कार्यकर्तृत्वाला पाँझिटीव्ह वाँच चा सलाम..काेळेकर यांनी दाखिवलेली तत्परता, कर्तव्य आणि माणुसकीचा नवा आदर्श नक्कीच सर्वांनी आत्मसात करण्यासारखाच आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.