WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

तज्ज्ञांची समिती नेमायला हवी.. तरच मानव व वन्यप्राणी संघर्ष राेखला जाईल , अन्यथा!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

अभ्यास व उपाययोजनांची गरज

शिराळा ( जी.जी.पाटील)

चांदोली परिसरासह शिराळा, कराड ,शाहुवाडी, वाळवा आदी तालुक्यात बिबट्यांचे व गव्यांचे वारंवार दर्शन होऊ लागले आहे.बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्लेही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. तर गव्याकडून पिकांचे नुकसान होत आहे.त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.अशातच नुकतेच रिळे येथील पाच गव्यांचा विषबाधेने मृत्यू तर चव्हाण वाडी येथील बिबट्याचा संशयास्पद मृत्यू यामुळेच मानव व वन्यप्राणी संघर्ष आता टोकाला गेल्याचे पहायला मिळत आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात तर दररोज कोठे ना कोठे तरी बिबट्याचे दर्शन होत आहे तर अनेक ठिकाणी तो पाळीव प्राण्यांना भक्ष करत आहे.गेल्या वर्षभरात १०७ पशुधनावर हल्ले झालेत.

अलीकडे मानवावर ही तो आक्रमण करू लागला आहे.उखळू येथील शाळकरी मुलावरील हल्ला, उदगिरी येथील मुलीचा मृत्यू,बिऊर येथील ऊसतोड मजूराच्या मुलाचा मृत्यू तर गव्याच्या हल्ल्यात काळुंद्रे येथील शेतक-याचा मृत्यू यासह गवे ,रानडुक्कर यांच्याकडून शेतीपिकांचे भयानक नुकसान होत आहे.काही भागातील शेतक-यानी पिके घेणेच बंद केलेय शेकडो एकर शेती पडून आहे.यामुळेच वन्यप्राणी व मानव यांचा संघर्ष आता टोकाला जावूनच विषबाधेचे प्रयोग होत असलेची चर्चा भागात दबक्या आवाजात होत आहे.

१. गवे व बिबट्यांचा अभयारण्या बाहेरील वावर यामुळेच कुंपनाचा प्रश्न ऐरणीवर
२.तालुक्यातील १०७ पशुधनावर गतवर्षीपासून हल्ले
३.अभयारण्यातील अन्न साखळी कमकुवत मुळे वन्यजीव बाहेर
३.वन्याप्राण्याकडून शेतपिकाचे नुकसानशेकडो एकर शेती पडून उदरनिर्वाह करायचा कसा 

खरेतर चांदोली अभयारण्यातील वन्यप्राण्यांची अन्नसाखळी मजबूत होण्याऐवजी ती कमकुवत झालीय. अन्नाच्या व पाण्याच्या शोधात वन्यजीव अभयारण्या बाहेर पडतात.त्याना अभयारण्यातच मुबलक प्रमाणात खाद्य व पाण्याची व्यवस्था झाली तरच मानव ववन्यप्राणी संघर्ष कमी होईल अन्याथा दिवसेंदिवस संघर्ष वाढतच जाईल यात शंका नाही.

सध्या या बिबट्यांचे पाळीव प्राणी तसेच मानवावरील होणारे हल्ले सध्या चिंतेचा विषय बनू लागला आहे. बळीराजाचेही पाळीव प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान होऊ लागले आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत मिळत आहे. मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. मानवी वस्ती मध्ये गवे व बिबट्यांचा वाढलेला वावर प्राण्यांवर तसेच मानवावर होणारे हल्ले याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने तज्ञांची समिती नेमून यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यामध्ये मानव व वन्यप्राणी यांचा संघर्ष वाढतच जाणार आहे.याचा वन्यजीव व वनविभाग यानी गांभीर्यपूर्वक विचार करण्याची गरज आहे.

वन्य प्राण्यांचा वावर मानवी वस्तीमध्ये… तहसिलदारांना भेटले ग्रामस्थ

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.