रानडुक्कर शिकार प्रकरणी बेलेवाडी च्या भगवान पाटील यास वनविभागाने घेतले ताब्यात
शिराळा (जी.जी.पाटील)
बेलेवाडी ता.शिराळा येथील भगवान गणपती पाटील यांनी जाळीच्या सहायाने रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार केलेची गुप्त बातमी मिळाली.त्यानुसार शिराळाचे अतिरिक्त वनक्षेत्रपाल यु.स.पाटील यांच्या पथकामार्फत घटनास्थळावरुन भगवान पाटील याना डुक्कर मांस व साहित्यासह ताब्यात घेतले.
यासंदर्भात वनविभाग शिराळा यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की,बेलेवाडी येथे रानडुक्कर शिकार झालेची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार शिराळा येथील वनक्षेत्रपाल श्री.यु.स. पाटील वनक्षेत्रपाल ,बिळाशी चे वनपाल श्री. चंद्रकांत देशमुख ,वनरक्षक बिऊर चे श्री. हणमंत पाटील , श्री. अभिजीत कुंभार, श्री. रविंद्र कोळी, अशोक खापरकर वनरक्षक व कायम वनमजूर हे तात्काळ मौजे बेलेवाडी ता.शिराळा येथील घटनास्थळी दाखल झाले.
शिराळा वनपरिक्षेत्रात वन्यप्राणी मृत्यूचे घटनांवर आळा घालणेकामी शिकारी व अवैदय कृत्य करणा-या व्यक्तींची माहिती वनविभागाचे १९२६ या टोल फ्री क्रमांकावर देणेबाबतचे आवाहन वनविभागामार्फत नागरिकांस केले आहे.
यावेळी रानडुक्कर वन्यप्राण्याची शिकार झालेचे निदर्शनास आले असून घटनास्थळी रानडुक्कर वन्यप्राण्याचे मांस, जाळी २, ससा वन्यप्राणी कातडी १, कु-हाड १ इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयीत आरोपी भगवान पाटील यांना चौकशी व पुढील तपासकामी ताब्यात घेणेत आले आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करुन योग्य ती जाब-जबाब इत्यादी कागदपत्रे तयार करणेत आली आहे. सांगलीच्या उप वनसंरक्षक (प्रा.) निता कट्टे, व डॉ. अजित साजणे सहा. वनसंरक्षक (वनी.) यांचे मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास श्री.यु.स. पाटील, वनक्षेत्रपाल शिराळा, (प्रा.) अति. हे करत आहे.
तज्ज्ञांची समिती नेमायला हवी.. तरच मानव व वन्यप्राणी संघर्ष राेखला जाईल , अन्यथा!