सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी काेल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
कोल्हापूर  :- अनंत चतुर्दशी दिवशी सार्वजनिक गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. इराणी खण येथे करण्यात येत असलेल्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या तयारीचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज संबंधीत सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. हि बैठक निवडणूक कार्यालयात सकाळी घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, नेहा आकोडे, कृष्णा पाटील, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता रमेश कांबळे, महादेव फुलारी, आर के पाटील, सुरेश पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, पर्यावरण अधिकारी अवधूत नेर्लेकर, सिस्टीम मॅनेजर यशपाल सिंग रजपूत, वर्कशॉप प्रमुख विजयसिंह दाभाडे, विद्युत अभियंता अमित दळवी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतीभोवती बॅरेकेटस् उभारण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. त्याचबरोबर या इमारतीजवळ धोकादायक असल्याचे फलक लावण्याच्या सूचनाही दिल्या. नागरिकांनी अशा  इमारतीच्या परिसरात  अगर इमारतीमध्ये प्रवेश  करु नये  असेही आवाहन त्यांनी केले आहे.  पावसाने विश्रांती दिल्याने विसर्जन मार्गावरील सर्व खड्डे युध्दपातळीवर डांबरी पॅचवर्क करण्याच्या सूचना उपशहर अभियंता यांना दिल्या. इराणी खण व विसर्जन मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही.लावण्याच्या सूचना दिल्यापोलिस प्रशासनाने निश्चित केलेल्या विसर्जन मार्गावर बॅरिकेटस्  वॉच टॉवर उभी करण्यात येत आहेतविसर्जन  मार्गावरील  सर्व अडथळे   अतिक्रमण काढण्यातयावीतमिरवणूक मार्गावरील अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या फादयाही छाटण्यात आलेची खात्री करण्याच्या सूचना उद्यान अधीक्षक यांना दिल्या. मिरवणूक मार्ग  विसर्जन ठिकाणी आवश्यक त्या लाईटची व्यवस्था करावीइराणी खणीवर सार्वजनिक गणेश मुर्ती विर्सजनासाठी चार क्रेन ठेवण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या.

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळांना महापालिकेच्यावतीने श्रीफळ अर्पण

            महापालिकेच्यावतीने मंगळवार, दि.17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक गणेश विर्सजनाचे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांचे अध्यक्षांना पापाची तिकटी व हॉकी स्टेडियम येथे पर्यायी मार्गावर स्वागत कक्षामध्ये प्रशासनाच्यावतीने श्रीफळ, पान, सुपारी, एक रोपटे देण्यात येणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी पवडी, आरोग्य, उद्यान व इतर विभागाचे 2500 कर्मचारी, विभागीय कार्यालयाअंतर्गत गणेश मुर्ती आणणेसाठी 70 टँम्पो 320  हमाल, 5 जे.सी.बी., 7 डंपर, 4 टॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बुम, 6 ॲम्बुलन्स व 8 फलोटींगचे तराफे अशी यंत्रणा सज्य करण्यात आली आहे. तसेच इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरेकेटींग करण्यात येत असून वॉच टॉवर व पोलिसांसाठी पेंडल उभे करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून विसर्जन मिरवणुक मार्ग, विसर्जन स्थळ ठिकाणी साफसफाई करण्यात येणार असून विसर्जन मार्गावर वैद्यकिय पथके नेमण्यात आलेली आहेत. अर्पण केलेल्या गणेशमुर्ती व निर्माल्य इराणी खण येथे पोहचविण्यासाठी वाहतुक व्यवस्था व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. नागरीकांच्या मदतीसाठी 0231-2545473 फोन व मो.नं.9970711936 मोबाईल नंबर उपलब्ध करुन दिलेला आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व सार्वजनिक मंडळांनी पर्यावरण पूरक गणेशमुर्तींचे विसर्जन इराणी खणीमध्ये करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.