WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – अरुण डोंगळे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

‘शाश्वत दुग्ध व्यवसाय व नवनिर्मित तंत्रज्ञान’ या विषयावरील एक दिवशीय परिसंवाद कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कंपाऊंड लाइव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई (क्लाफ्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शाश्वत दुग्ध व्यवसाय व नवनिर्मित तंत्रज्ञान’ या विषयावरील एक दिवशीय परिसंवाद कार्यशाळा रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर येथे संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते संचालक नवीद मुश्रीफ, अजित नरके व संघाचे संचालक, क्लाफ्मा ऑफ इंडियाचे चेअरमन दिव्या कुमार गुलाटी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.०२/०५/२०२५ इ.रोजी संपन्न झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, दुग्धव्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी दुग्ध व्यवसायातील आव्हाने बहुआयामी दृष्टिकोनाच्या मार्गाने हाताळून दूध उत्पादन वाढीसाठी व जनावरांचे प्रजनन यासाठी संतुलित आहाराची उपलब्धता सुनिश्चित करून शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. या परिसंवाद कार्यशाळेमुळे दुग्ध व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि व्यवस्थापनाच्या पद्धतीची माहिती मिळाली या माहितीचा उपयोग दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी होईल असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी क्लाप्मा ऑफ इंडियाचे चेअरमन दिव्या कुमार गुलाटी यांनी कंपाऊंड फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (क्लाफ्मा) ऑफ इंडिया या संस्थेची माहिती देताना सांगितले की क्लाफ्मा हि पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची देशपातळीवरील संस्था असून जनावरांच्या संतुलित आहारा बाबत जनजागृतीसाठी असे परिसंवाद देशभर आयोजित करते.

यावेळी आयुर्वेदिक औषधोपचार, ताण तणाव व्यवस्थापन आणि टी.एम.आर.चे फायदे, पंजाब मधील प्रगत दुग्धव्यवसायाची यशोगाथा, म्हैस संगोपन, पशुपोषण आहार व्यवस्थापन, छोटे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सायलेज निर्मिती व वापर या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. परिसंवादाच्या शेवटच्या चर्चासत्रात उपस्थितीत दूध उत्पादकांनी मांडलेल्या दुग्ध व्यवसायातील समस्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये दुग्ध व्यवसायमध्ये काम करणारे तज्ञ डॉक्टर, अधिकारी, दूध उत्पादक, महिला या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते.

याप्रसंगी संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, अजित नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी मनोगते व्यक्त केली. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत क्लाप्मा ऑफ इंडियाचे माजी चेअरमन एस.व्ही.भावे यांनी केले. तर या परिसंवाद कार्यशाळेच्या प्रायोजक व तज्ञ वक्ते यांना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तर आभार डॉ.सैकत साहा यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एम.पी.पाटील यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, क्लाफ्मा ऑफ इंडियाचे चेअरमन दिव्या कुमार गुलाटी, गोकुळचे संचालक अजित नरके, नवीद मुश्रीफ, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, नंदकुमार ढेंगे, बयाजी शेळके, युवराज पाटील, एस. व्ही. भावे, पश्चिम विभागाचे अध्यक्ष डॉ.सैकेत साहा, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डॉ.एस.व्ही.आंबे, डॉ.प्रितपाल सिंग, डॉ.मनिष शर्मा, डॉ.नितीन मार्कडेय, डॉ.प्रशांत शिंदे, डॉ.चंद्रशेखर पांडे, डॉ.प्रदीप महाजन, डॉ.विजय मगरे, डॉ.श्रीहर्ष के.व्ही.एस., डॉ.सैकत साहा, डॉ.प्रकाश साळुंके, डॉ.व्ही.डी.पाटील तसेच देशातील पशुखाद्य निर्मिती करण्याऱ्या कारखान्यांचे प्रतिनिधी, संघाचे अधिकारी आणि दूध उत्पादक, महिला आदि मान्यवर उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.