युवक-युवतींना अशीही एक संधी.. पूर्ण वाचा… ठरवा. भाग घ्या!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नेहरु युवा केंद्रामार्फत एक दिवसीय

जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर: नेहरु युवा केंद्रामार्फत एक दिवसीय जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमाचे राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथे दि. 3 मार्च 2023 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी https://forms.gle/ue9Ew7oLiWBkS4wU7 या लिंकव्दारे आपली नावनोंदणी करण्याचे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी पूजा सैनी यांनी केले आहे.

राष्ट्रीय युवा नेतृत्व कार्यक्रम ही केंद्र सरकारची योजना आहे. या एकदिवसीय कार्यक्रमात 4 सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये भारताचे G20 अध्यक्षपदाचे महत्व व Y20 युवा शिखर परिषद, मिशन लाइफ आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष परस्पर संवाद सत्र, युवा संसद चर्चासत्रे व कोल्हापूर जिल्ह्याचे वेगळेपण दाखवणारा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

कार्यक्रमाचा उद्देश युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त करणे व त्यांना राष्ट्र उभारणीच्या विकास प्रक्रियेत आणणे हा असून सहभागी होणाऱ्या युवक-युवतींना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही श्रीमती सैनी यांनी कळविले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.