दुधगंगा डावा कालव्यातील नादुरुस्त गेट दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण होणार

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

कोल्हापूर मौजे मोघर्डे, ता. राधानगरी हद्दीतील दुधगंगा डावा कालवा कि.मी. 13 सा.क्र. 12/200 मी. येथील नादुरुस्त गेटमुळे पाणी वाया जात असल्याबाबत आपले सरकार पोर्टलवर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, संबंधित गेट दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचा खुलासा दुधगंगा डावा कालवा उपविभाग क्र. 2, तिटवे यांच्या वतीने करण्यात आला आहे.

या अनुषंगाने यांत्रिकी विभाग, कोल्हापूर कार्यालयामार्फत आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. गेट दुरुस्तीचे काम करताना झडप द्वार बसविण्यासाठी विद्यमान संधानकाचे बांधकाम काढणे, झडप द्वार बसविणे आणि त्यानंतर बांधकाम पूर्ववत करणे आवश्यक असल्याने सदर कामाचा समावेश दुधगंगा प्रकल्पाच्या सन 2025-26 च्या प्राणसूचीत करण्यात आला होता. या कामास महामंडळाच्या पत्रानुसार 16 ऑक्टोबर 2025 रोजी मंजुरी मिळाली असून, विभागीय कार्यालयाकडून 11 फेब्रुवारी रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे.

संबंधित काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांकडून सुमारे 8 ते 10 दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याचे कळविण्यात आले आहे. दरम्यान, डावा कालव्यातील सा.क्र. 3/290 येथील CR cum escape च्या hoist arrangement मधील रॉड तुटल्याने गेटमध्ये गॅप निर्माण झाला आहे. तसेच उजवा कालवा सुरू असल्यामुळे डावा कालवा बंद असतानाही सुमारे 100 क्युसेक्सने पाणी वाहत राहते. याशिवाय सा.क्र. 11/940 गैबी येथील CR cum escape गेटची दुरुस्ती अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही ठिकाणच्या गळतीमुळे डाव्या कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने मुख्य गेट दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

या सर्व बाबींचा विचार करून संबंधित गेटच्या दुरुस्तीसाठी कालव्यातील पाणी पूर्णपणे बंद करणे आवश्यक असल्याचे उपविभागीय कार्यालयाने स्पष्ट केले आहे. स्थापत्य व यांत्रिकी विभागाच्या समन्वयातून तातडीने काम पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपविभागीय अभियंता उ. सु. माणकापुरे यांनी दिली.

​

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.