|
चिपळूण- (रंजित आवले) : चिपळूण तालुक्यातील रामपूर येथील आवटेवाडी परिसरात आंब्याच्या बागेत जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मानवी अवशेषांच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. या गंभीर प्रकरणाचा वेगाने आणि अत्यंत शिताफीने तपास करत चिपळूण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुंबईतील भीषण हत्याकांडाचा पर्दाफाश करत मुख्य संशयित आरोपी विशाल विजय खोडदेकर आणि त्याची मैत्रीण जन्नतुनिसा झिन्नत खान यांना अटक केली. या धडाकेबाज कामगिरीमुळे पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आणि ३१ मार्च रोजी पहाटे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना अटक करण्याची ही कामगिरी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे. हा लेख देखिल खूप वाचला गेला… लिंक क्लिक करा...“बदलती जीवनशैली आणि वाढणारे घटस्फोटाचे प्रमाण : विवाहसंस्थेसमोरील नवे आव्हान!” या वेळी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कायदेशीर सल्लागार तसेच कोकण कन्या सोशल वेल्फेअर फाऊंडेशनच्या अध्यक्षा ऍड. वृषाली सावंत, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा सचिव पूर्वाताई तांदळे, जिजाऊ ब्रिगेड शहर अध्यक्ष व रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशनच्या जिल्हा अध्यक्षा वर्षा खटके पाटील, समाजसेविका पूनम ताई भोजने, तृप्ती ताई कदम, ऍड. प्रियांका वाटेकर, जिजाऊ ब्रिगेड सदस्य दिलबर शराफत खान, नाटूस्कर ताई तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.सर्व उपस्थितांनी चिपळूण पोलीस प्रशासनाच्या तत्परता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करत भविष्यातही अशाच पद्धतीने गुन्हेगारीवर लगाम घालण्याची अपेक्षा व्यक्त केली.
|
चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २४ तासांत भीषण हत्याकांडाचा उलगडा, विविध संस्थांकडून कौतुकाचा वर्षाव
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375







































































