युवा ग्रामीण पत संस्थेस सन 2025-26 याआर्थीक वर्षात 46 लाख रुपयांचा नफा – चेअरमन अर्जुन आबिटकर 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

कोल्हापूर जिल्ह्यातील एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून युवा ग्रामीण पतसंस्थेची ओळख

गारगोटी प्रतिनिधी – ग्रामीण अर्थकारणाला पाठबळ मिळावे यासाठी युवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, गारगोटी संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेस सन 2025-26 याआर्थीक वर्षात संस्थेला 46 लाख रूपयांचा नफा झाल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व संस्थेचे चेअरमन अर्जुन आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून युवा ग्रामीण पतसंस्थेची ओळख आहे. संस्थेमार्फत डिजीटल बँकींग सुविधा, RTGS/IMPS, SMS अलर्ट, मोबाईल बँकींग, लॉकर सुविधा, पिग्मी ॲप, विजबील भरणा आदी सुविधा सुरू आहेत. संस्थेच्या राधानगरी, भुदरगड तालुक्यांमध्ये 5 शाखा असून व मुख्य कार्यालय स्वतंत्र आहे. युवा पतसंस्था नेहमीच व्यवसायिक दृष्टीकोन ठेवून काम करत असल्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विश्वास संस्थेने मिळवला असल्याचे प्रतिपादन आबिटकर यांनी केले. 

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

सभासदांनी पतसंस्थेवर विश्वास ठेवून 28 कोटींच्या ठेवी ठेवल्या आहेत. संस्थेची 8 कोटी 53 लाख इतकी गुंतवणूक असून कर्ज वाटप 22 कोटींच्या जवळपास पोहोचले आहे. तसेच वार्षिक उलाढाल अंदाजे 239 कोटी इतकी झाली असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन अर्जुन आबिटकर, व्हा.चेअरमन बाजीराव खापरे, मॅनेजर चंद्रकांत गाडेकर यांच्यासह संचालक मंडळाने दिली.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.