WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय – शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय नायगाव शाखा स्नेहसम्मेलन…

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगांव शाखेचे ७२ वे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक ३० मार्च २०२३ रोजी उत्साहात पार पडले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कर्णिक व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार, लेखक श्री. सुधींद्र कुलकर्णी तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र मुणगेकर कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. प्रदीप कर्णिक व प्रमुख पाहुणे सुधींद्र कुलकर्णी व शाखेचे प्रमुख कार्यवाह तसेच शाखेचे सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यावर कार्यक्रमाला सुरुवात झाली. शारदाश्रम विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी ‘सरस्वती वंदन’ सादर केले. तसेच कलांजली प्रस्तुत मधुजा गोलतकर हिने सुंदर भरतनाट्यम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

बालमोहन विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थी दुर्व कुणाल दळवी याने प्रभावी असे माझी आजी यावर वक्तृत्व केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा शाल, श्रीफळ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.डॉ.भालचंद्र मुणगेकर सरांनी नायगाव शाखेचे,कार्यकारणी, सदस्य व सेवकांचे मनापासून कौतुक केले.सुधींद्र कुलकर्णी यांनी छान मार्गदर्शनपर भाष्य केले त्यांना ग्रंथसंग्रहालयाबद्दल आस्था असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. ते चार वर्षांपूर्वी ग्रंथालयात आले होते. तेव्हाचे ग्रंथालय व आत्ताचे ग्रंथालय यातील फरक त्यांना जाणवला आणि त्यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे भारतातील उत्कृष्ट ग्रंथालय असू शकते हे मत मांडले आणि संस्थेच्या कार्यकारणी सदस्यांचे भरभरून कौतुक केले. त्यांनी संस्थेच्या मराठी संशोधन मंडळ, इतिहास संशोधन मंडळ, संदर्भ विभाग व नायगाव शाखा देवघेव विभाग यांना भेट दिली व काम पाहून ते खूप भारावून गेले.भविष्यात संस्थेला लागेल ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच संस्था सुधारण्यासाठी लागणारी मदत मी करेन असेही सांगितले.

प्रदीप कर्णिक यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाबाबत माहिती दिली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे जगातील एकमेव असे ग्रंथालय आहे. जे एकूण २ संशोधन मंडळे चालवितात इतिहास संशोधन मंडळ, मराठी संशोधन मंडळ, दाते सूची मंडळ, नाट्य मंडळ असे वेगवेगळे उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात,याबद्दल त्यांनी संस्थेचे भरभरून कौतुक केले.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नायगांव शाखेतर्फे सेनापती बापट वक्तृत्व स्पर्धा,खुली राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा व खुली सुंदर हस्ताक्षर स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण २१ शाळा व ४५० विद्यार्थ्यांनी उत्साहने सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद केसरकर यांनी केले.नायगाव शाखेचे कार्यवाह अमेय कोंडविलकर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी शाखेला देणगी दिलेल्या देणगीदारांचे आभार मानले.तसेच शाखेतील कर्मचारी व कार्यक्रमास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदत केलेल्या सेवकांचे भेटवस्तू देऊन आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.