“माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळ भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा – 29 व 30 जुलैला महाराष्ट्रभर कडक सुरक्षा”

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर, WATCH TEAM: माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळातील निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक पदांसाठी 29 व 30 जुलै रोजी ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या आठ जिल्ह्यांतील 22 परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. परीक्षेच्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनासह सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून, परीक्षा केंद्र परिसरात आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

ही परीक्षा मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) लिमिटेडमार्फत पूर्णपणे ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास किंवा कोणतीही व्यक्ती अथवा संस्था गैरमार्गाचाा आमिष दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्यास अशा कोणत्याही गैर प्रकारास बळी पडू नये.

तसेच अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले.

 

 

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.