|
कोल्हापूर महानगरपालिकेने संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खासगी संस्थेला चालविण्यास देण्याबाबत २० जुलै रोजी केलेल्या ठरावाच्या निषेधार्थ आज कोल्हापूरातील रंगकर्मी, नाट्यप्रेमी आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित विविध घटक, शाहू प्रेमी, समस्त कोल्हापूरकर यांच्या वतीने लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून या निर्णयाविरोधातील लोकभावना ठामपणे व्यक्त करण्यात आली. या आंदोलनाला कोल्हापूरातील नागरिक, विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्था, संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवत नाट्यगृहाच्या खासगीकरणाला स्पष्ट विरोध नोंदविला. राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेले हे नाट्यगृह केवळ एक वास्तू नसून कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनाबरोबरच खाजगीकरणाची प्रक्रिया बेकायदेशीर आहे असं नमूद करत या प्रस्तावाला कोर्टातून ही आव्हान देण्याचं ठरवण्यात आलं याप्रसंगी रंगकर्मींच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून त्याची प्रत या प्रेस नोटसोबत जोडण्यात येत आहे.
या आंदोलनावेळी दूरध्वनीवरून कोल्हापूरचे खासदार माननीय शाहू महाराज छत्रपती यांनी दिल्लीवरून आंदोलनाला पाठिंबा दर्शवत खाजगीकरणाला विरोध व्यक्त केला. सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही दूरध्वनीवरून खाजगीकरणाला विरोध दर्शवला आणि आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला.
यावेळी उपस्थित सुनील घोरपडे, आनंद काळे,किरणसिंह चव्हाण, प्रसाद जमदग्नी, रोहन घोरपडे, हर्षल सुर्वे,इंद्रजीत सावंत, विजय देवणे,चंद्रकांत यादव,राजेश लाटकर,सुनील मोदी,प्रवीण केसरकर,अमर समर्थ,सचिन चव्हाण, विनायक फाळके, संदीप देसाई, इंद्रजीत बोंद्रे, वसंतराव मुळीक,ऍड. इंद्रजीत चव्हाण राहुल इंगवले, उमेश पवार चंद्रकांत पाटील, सुनिता पाटील समस्त रंगकर्मी |
कोल्हापूर रंगकर्मींचे ठिय्या आंदोलन – नाट्यगृह खाजगीकरणाविरोधात तीव्र निषेध
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.













































































