ऑनलाईन पेमेंटची सुविधा २४ तास..बिल भरण्याचे महावितरणचे आवाहन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर/सांगली WATCH TEAM : देशातील बँक कर्मचारी संघटनांनी दि. २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत देशव्यापी संप पुकारल्याने बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांची प्रॉम्प्ट पेमेंट किंवा अंतिम भरणा तारीख २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान आहे, त्यांनी वीज बिल भरण्यासाठी शेवटच्या तारखेची प्रतीक्षा न करता वेळेपूर्वी आपले बिल वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. याचबरोबर वीज ग्राहक ऑनलाईन पद्धतीने आपले वीज बिल कोठूनही व विहित मुदतीत भरु शकतात.

अनेक वीज ग्राहक बिलाचा भरणा धनादेश अथवा बँकिंग व्यवहाराद्वारे करतात. मात्र, संपाच्या कालावधीत बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वीज बिल भरण्यास अडचण येऊ शकते. ही संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वीच ऑनलाईन अथवा डिजिटल पद्धतीने वीज बिलाचा भरणा करावा. ग्राहकांच्या सोयीसाठी रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी बहुतांश बँका सुरू राहणार आहेत. तसेच वीज ग्राहक महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ॲपद्वारे वीज बिल भरता येते. याशिवाय युपीआय, भीम पे, गुगल पे, फोन पे, इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंग यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करता येणार आहे. अधिकृत वीज बिल भरणा केंद्रांवरही वीज बिलाचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

वेळेत ऑनलाइन बिल भरल्याने संभाव्य गैरसोय टाळण्यासोबतच पात्र ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट लाभ घेता येतो. ग्राहकांनी बँक संपाच्या कालावधीची संभाव्य गैरसोय लक्षात घेऊन वीज बिल वेळेत भरावे व ऑनलाईन व डिजिटल पेमेंट सुविधांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.