सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस ‘अॅक्शन मोड’वर; मध्यवर्ती भागात पोलिसांचे संचलन, ‘दंगा काबू’ योजनेचे प्रात्यक्षिक!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर:TEAM WATCH  आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीरनगरीत शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाने कंबर कसली आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ करण्यासाठी आज शहराच्या मुख्य आणि गजबजलेल्या भागात पोलिसांचे तगडे पथसंचलन (रूट मार्च) करण्यात आले.
आज शनिवारी  संध्याकाळी साडेपाचनंतर  प्रिया पाटील मॅडम (उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग) यांच्या मुख्य उपस्थितीत हा सुरक्षा मार्च काढण्यात आला होता. या मोहिमेत शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, राजारामपुरी भागातील विकास जाधव साहेब, विविध पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यासह आरसीपी (Riot Control Police) चे जवान आणि होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रमुख मार्गांवर रंगला पोलिसांचा मार्च: शहरातील वाहतुकीच्या आणि गर्दीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खालील परिसरांना या संचलनात कव्हर करण्यात आले:
      • मध्यवर्ती बस स्थानक परिसर (CBS)
      • पारिख पूल
      • जनता बाजार चौक
      • बागल चौक
      • शाहू मिल कंपाऊंड
      ‘दंगा काबू’ योजनेचे अचूक प्रात्यक्षिक:
      केवळ संचलन करून न थांबता, ऐन सणासुदीच्या काळात किंवा गर्दीच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडल्यास पोलीस किती वेगाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतात, याची चाचपणी करण्यासाठी जनता बाजार चौक आणि शाहू मिल कंपाऊंड येथे ‘दंगा काबू’ (Riot Control) योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस दल किती सज्ज आहे, याचेच प्रदर्शन या प्रात्यक्षिकातून पाहायला मिळाले.

कोल्हापूर पोलिसांच्या या शिस्तबद्ध आणि आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना कडक इशारा मिळाला असून, नवरात्रीच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर आता अधिक सुरक्षित वातावरणात सज्ज झाले आहेत.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.