पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
|
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत निवडणूक रणनीतीवर चर्चा; शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कार्य करण्याचा कौस्तुभ गावडे यांचा निर्धार
सातारा- TEAM WATCH
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षसंघटना अधिक बळकट करणे, कार्यकर्त्यांची भूमिका आणि मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी करावयाचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने युवकांना सक्षम करून त्यांच्या प्रगतीसाठी नव्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच शिक्षक व पदवीधरांच्या विविध ज्वलंत प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे, यावर विशेष भर देण्यात आला. आगामी काळात शिक्षक व पदवीधर मतदारांशी प्रभावी संवाद साधून पक्षाची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याबाबत प्रदेशाध्यक्षांनी मार्गदर्शन केले.
कौस्तुभ गावडे यांचा शिक्षकांच्या प्रश्नांवर निर्धार: पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार म्हणून शिक्षकांच्या समस्या, त्यांच्या न्याय्य मागण्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार शिक्षक मित्र श्री. कौस्तुभ गावडे यांनी या बैठकीत व्यक्त केला. शिक्षकांचा आवाज प्रभावीपणे विधान परिषदेत पोहोचविणे हाच आपला मुख्य केंद्रबिंदू असेल, असे त्यांनी नमूद केले.शिक्षकांच्या सेवा-सुरक्षेचे प्रश्न, शैक्षणिक धोरणांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रखडलेली भरती, आवश्यक विशेष शिक्षकांची नियुक्ती, तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी मांडली. शिक्षकांचे प्रश्न केवळ मांडण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यावर ठोस उपाययोजना व्हाव्यात, यासाठी शासन आणि संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. |
 |
या महत्त्वपूर्ण बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, धैर्यशील कदम, श्रीमती प्रियाताई शिंदे उपस्थित होते. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांच्यासह भाजपाचे विविध प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
|
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 17