वाहतूक शाखा…. अँक्शन माेडमध्ये, रस्त्यावरची वाहने थेट हाेणार टाेईंग

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर: TEAM WATCH   आगामी नवरात्रोत्सवाच्या काळात करवीर नगरीत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने ‘अॅक्शन मोड’मध्ये येत एक मोठी आणि सकारात्मक कारवाई केली आहे. शहरात जिल्ह्यातून, परजिल्ह्यातून आणि राज्यातून लाखो भाविक आपल्या वाहनांनी येत असतात. या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिसांनी रस्त्याच्या कडेला अनेक दिवसांपासून बेवारस आणि धूळ खात पडलेली एकूण १६० चारचाकी आणि ४१ दुचाकी वाहने हटवली आहेत.पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० या वेळेत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. शहरातील वाहतुकीला सर्वाधिक अडथळा ठरणारी वाहने शोधून ती हटवण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम चालली:

या प्रमुख भागात कारवाई करण्यात आली आहे. 

पाेलिस विभागाचा इशारा.. .अन्यथा वाहने होणार टोईंग. दंडात्मक कारवाई!
वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे की, रस्त्याकडेला धूळ खात पडलेल्या वाहनांवर सध्या नोटिसा चिकटवल्या जात आहेत. ही नोटीस देऊनही जर वाहनधारकांनी आपली वाहने हटवली नाहीत, तर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ती वाहने टोईंग (जप्त) करून कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाईल.तसेच, नवरात्रीच्या काळात भाविकांची आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहने अस्ताव्यस्त पार्क करू नयेत आणि दुचाकींचे डबल पार्किंग टाळावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. आगामी काळात ही मोहीम संपूर्ण कोल्हापूर शहरात अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे.
ही कौतुकास्पद कारवाई शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली पोसई  पालखे, पोसई  गिरीगोसावी आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने यशस्वीपणे पूर्ण केली.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.