कोल्हापूर: वाढती महागाई, महिला सुरक्षा, पेपर फुटी प्रकरण, बेरोजगारी, खते, बि बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली आडवणूक, चिखलात सुरू असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबतचा विलंब तसेच राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थाविषयी कोल्हापूर येथे काँग्रेस च्या वतीने चिखल फेक आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष व विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष सचिन प्रल्हाद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन छेडण्यात आले. महाभ्रष्ट भाजप राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन आज कोल्हापूर काँग्रेस कार्यालयासमोर करण्यात आले.
यावेळी राज्य व केंद्र सरकारने केलेली महागाई, महिला सुरक्षा, पेपर फुटी, बेरोजगारी, खते, बि बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली आडवणूक, चिखलात सुरू असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चाल ढकल, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था व्यवस्था याबद्दल चिखल फेक आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सरकारविरोधी घोषणा देत, राजकीय नेत्यावर शाब्दिक ताशेरे ओढले.
औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेली पडझड, बि बियाणांचा काळाबाजार, विविध परीक्षा मध्ये होत असलेले घोळ, पेपरफुटी यामुळे हजारो लाखो विद्यार्थी वर्गाचे होत असलेले नुकसान तसेच जातीय, धार्मिक तेढ निर्माण करून समाजात अशांतता पसरविण्याचा प्रकार करणे, यासारख्या विषयांना या आंदोलनात हात घालण्यात आला.
या आंदोलनात उदय पोवार, अक्षय शेळके, मयूर पाटील, संपत पाटील, किशोर खानविलकर, संजय पोवार – वाईकर, प्रवीण पुजारी, संजय पटकारे, सुशांत विभुते, रियाज सय्यद, आनंदा करपे, प्रथमेश कांबळे, आकाश शेलार, रणजीत पोवार, संग्राम गायकवाड, डॉ. प्रमोद बुळबुले, मुझ्झफर टिनवाले, विश्वविक्रम कांबळे, अमर देसाई, अर्जुन सकटे, कपिल सकटे, सुशांत गायकवाड, गिरीश शिंदे, अमोल गावडे, सचिन ससाणे, शुभम सावर्डेकर, रोहन शारबिद्रे , निलेश खरबडे यासह ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस, NSUI, सेवादल, OBC सेल, अनु. जाती विभाग, रोजगार स्वयंरोजगार, परिवहन, माथाडी कामगार, व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.