कोल्हापूर -शेळकेवाडी येथे पुरुषांनी साजरी केली वटपौर्णिमा !कोल्हापूर जिल्हयातील मौजे शेळकेवाडी हे गाव नेहमीच सामाजिक प्रयोग करणारे गाव म्हणून समस्त कोल्हापूर जिल्ह्याला परिचित आहे. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने इथले गावकरी विविध स्पर्धेत कायमचं अग्रभागी असतात. यावेळी या गावाने “माझी वसुंधरा अभियान” या अभियानामध्ये सहभाग घेण्याबरोबरच गावातील चक्क पुरुष वर्गाने वटपोर्णिमा साजरी करत अनोखा उपक्रम घेत, नवी परंपरा प्रस्थापित केली आहे.
शुक्रवारी सर्वत्र प्रत्येक गावात वटपोर्णिमा हा सण मोठया उत्साहात साजरा केला गेला. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत जन्मोजन्मी हाच पतीदेव मिळो अशी प्रार्थना करतात, मात्र ही मौजे शेळकेवाडी येथील पुरुषांनीच वटपौर्णिमा सजरी केली.आज शेळकेवाडीतील पुरुषांनीही उपवास करून आपल्या पत्नीला निरोगी व दीर्घायुष्य लाभाव म्हणून वडाला प्रदक्षिणा घातल्या आहेत. त्याच सोबत दुर्मिळ होत चाललेली वडाची १० झाडे शाळेच्या पटांगणात लावून ती जगवण्याचा संकल्प यानिमित्ताने पुरुषांनी केला आहे.
यानिम्मित शेळकेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने नवविवाहित जोडप्यांना वडाचे रोप भेट देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यासाठी सरपंच तेजश्री शेळके, उपसरपंच व ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच मंडळ अधिकारी पाटील, कृषी सहाय्यक बावडेकर, ग्रामसेवक सुरेखा आव्हाड, अंगणवाडीच्या उपासे मॅडम, आरती शेळके सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पुरुष,तरुण मंडळे ,उपस्थित होते. या विशेष उपक्रमाला साथ दिली ती अवनी या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्या कादंबरी भोसले ,माया जोगडे ,केदार पाटील यांनी. या सोहळ्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.