|
जागतिक समतोल राखण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सर्वच देशांनी पर्यटनाला अधिक महत्त्व दिले पाहिजे. जगातील विविध देशांना आपली आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी पर्यटनाला चालना देण्याची नितांत गरज आहे. पर्यटनाचे महत्त्व आणि लोकप्रियता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) १९८० सालापासून “२७ सप्टेंबर” हा ‘विश्व पर्यटन दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. कारण २७ सप्टेंबर १९७० रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ‘विश्व पर्यटन संघटने’चे (UNWTO) संविधान स्वीकारले होते. मानवी जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण व्हावा, याकरिता पर्यटनस्थळांना भेट देणे गरजेचे असते. पर्यटन केवळ आनंदच देत नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावून देशाला बळकट करण्याचे काम करते. आज जगभरातील अनेक देशांची अर्थव्यवस्था केवळ पर्यटनामुळे मजबूत झाल्याचे दिसून येते. भारत हा पर्यटनासाठी आणि पर्यटकांसाठी एक स्वर्ग मानला जातो, तसेच तो विश्व शांतीचा दूत आहे. आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
पर्यावरण व जागतिक प्रदूषण नियंत्रणातही पर्यटनाची मोठी भूमिका असते. पर्यटनावर जेवढा भर दिला जाईल, तेवढा निसर्गाचा संवर्धन दर वाढेल; ज्यामुळे मानवजातीसह जीवजंतू, वन्यप्राणी आणि जंगलसंपदा यांना मोठा दिलासा मिळेल. म्हणून पर्यटनाला अग्रक्रम देण्याची गरज आहे. भारतात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्यात विपुल प्रमाणात पर्यटनस्थळे पाहायला मिळतात. आजही लाखो परदेशी पर्यटक भारताला भेट देऊन येथील पर्यटनाचा आनंद घेतात. पर्यटनस्थळे देशाला सुशोभित करतात आणि विकासाला चालना देतात. भारतातील ऐतिहासिक, पुरातन आणि जागतिक वारसा (World Heritage) मिळालेल्या प्रसिद्ध स्थळांमुळे भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. येथील निसर्ग आणि संस्कृती परदेशी पर्यटकांचे मन मोहून टाकते. भारतीय पर्यटकही देशातील विविध रम्य ठिकाणी भेट देऊन पर्यटन संस्कृती जपत असतात. पर्यटनाला चालना मिळावी आणि स्थानिकांना रोजगार मिळावा, या उद्देशाने देशातील प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान १० पर्यटनस्थळांना भेट देऊन भारताचा सन्मान वाढवला पाहिजे. भारतात विविध राजे-महाराजांचा वारसा, ऐतिहासिक किल्ले, काश्मीरसारखी निसर्गरम्य ठिकाणे, प्रसिद्ध देवस्थाने, ताजमहाल, कुतुबमिनार, बोधगया यांसारखी हजारो ऐतिहासिक स्थळे आहेत. परंतु, सध्या जागतिक पातळीवर निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे काही पर्यटनस्थळे दुर्लक्षित होत आहेत. त्यांचे रक्षण करण्यासाठी जगातील सर्व देशांनी पुढाकार घेतला पाहिजे. वाढते प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming), अल-निनोचा प्रभाव, प्लास्टिकचे दुष्परिणाम, वाढते तापमान, भूकंप, सुनामी, महाप्रलय, ज्वालामुखीचा उद्रेक आणि वाढती लोकसंख्या यांमुळे पर्यटनस्थळांवर विपरीत परिणाम होत असून पर्यटकांनाही त्याचा फटका बसत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात विचारमंथन होणे गरजेचे आहे. जागतिक तापमानवाढीमुळे मोठे ग्लेशियर्स (हिमनद्या) वितळत आहेत; याचे एक जिवंत उदाहरण २६ ऑगस्ट २०२६ रोजी नेपाळमधील महाप्रलयाच्या रूपात पाहायला मिळाले. आज भारत आणि जगातील एक प्रमुख आकर्षण म्हणून गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या काठावर भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा “स्टॅच्यू ऑफ युनिटी” हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या व्यतिरिक्त भारतात गडकिल्ले, प्राचीन भव्य मंदिरे, अजिंठा-वेूळची लेणी, बोधगया, कुतुबमिनार आणि ताजमहाल यांसारखी अगणित पर्यटनस्थळे आहेत. जागतिक दृष्टिकोनातून विचार केल्यास संपूर्ण भारत हा पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. भारतातील पर्यटनस्थळांवर विविध ऋषी-मुनी, साधू-संत, विविध वेशभूषा, पूजापद्धती, भारतीय संस्कृती, विविध भाषा, थोर महात्मे, क्रांतिकारक आणि विविध धर्मांचा इतिहास यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. परदेशी पर्यटक भारतीय खाद्यसंस्कृतीचा (खानपान) देखील आवडीने आस्वाद घेतात.
नुकतेच महाराष्ट्र शासनाने नागपूर जिल्ह्याला “पर्यटन जिल्हा” घोषित केल्यामुळे प्रभु रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या रामटेक येथील ‘खिंडसी जलक्रीडा केंद्र’ आणि ‘रामधाम तीर्थक्षेत्रा’ला एक नवी ओळख मिळाली आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा कायापालट होत आहे. आज संपूर्ण जगाने पर्यटन वाढवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. यामुळे प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण होईल, राष्ट्रांमधील मैत्री वाढेल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. या दृष्टिकोनातून २७ सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभराने संकल्प केला पाहिजे. पर्यटनामुळे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रांना मोठी गती मिळते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बंधुता वाढते. जगात अनेक देशांत मोठी पर्यटनस्थळे आहेत. उदाहरणार्थ, युक्रेन पर्यटनासाठी प्रसिद्ध होते, परंतु गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे तेथील पर्यटन उध्वस्त झाले आहे. तसेच चीनच्या आर्थिक धोरणांमुळे श्रीलंकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली असली, तरी श्रीलंका सध्या पर्यटनावर भर देऊन आपली अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या देशांमध्ये युद्ध किंवा गृहयुद्ध सुरू आहे, तेथील पर्यटनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे; म्हणूनच पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्व देशांनी शांततेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. मानवजात, वन्यजीव, पशुपक्षी आणि जल-वायू यांचे रक्षण करण्यासाठी जगाने पर्यटनाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. पर्यटन दिनाचे औचित्य साधून प्रत्येक देशाने पर्यटकांच्या व सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले पाहिजे. यामुळे पर्यटकांमध्ये नवीन आशा आणि नवी दिशा निर्माण होईल. या जागतिक पर्यटन दिनानिमित्त शासन, प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी वृक्षलागवडीचा ठाम संकल्प करावा, ज्यामुळे पर्यटनाच्या विकासाला अधिक बळ मिळेल. लेखक: रमेश कृष्णराव लांजेवार (स्वतंत्र पत्रकार) मो. नं. ९९२१६९०७७९, नागपूर. |
जागतिक पर्यटन दिवस —-जगासाठी सामाजिक, सांस्कृतिक, एकता आणि आर्थिक विकासाचा “आधारस्तंभ”.
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.












































































