WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

बुद्ध पौर्णिमेला निसर्गप्रेमीची जंगलातील ती रात्र…सविस्तर वाचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काय घडलं..!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

शिराळा (जी.जी.पाटील)

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री निसर्गप्रेमींनी घेतला ‘निसर्गानुभव’ वन्य प्राणी गणनेत निसर्गप्रेमींना एकूण ३७४ प्राणी व पक्षांचे दर्शन घडले.

शिराळा – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून बुद्ध पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या “निसर्गानुभव कार्यक्रम २०२३” अंतर्गत पार पडलेल्या मचाणावरील वन्य प्राणी गणनेत निसर्गप्रेमींना एकुण ३७४ वन्यप्राण्यांचे दर्शन घडले आहे. बुद्ध पौर्णिमेला म्हणजे ०५ मे ला ‘निसर्गानुभव कार्यक्रम २०२३’ निमित्त निवडण्यात आलेल्या ६० निसर्गप्रेमींना – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना, बामणोली, चांदोली, ढेबेवाडी आणि हेळवाक या वन परिक्षेत्रांतील जंगलातील ६० मचानावर बसून अरण्यवाचनाचा थरारक अनुभव घेण्याची संधी मिळाली. सदर वन्यप्राणी गणनेत बिबट्यासह एकुण १८ सस्तन वन्य प्राणी प्रजातींचे तसेच १० वन्य पक्षी प्रजातींचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले आहे.

निसर्गानुभव कार्यक्रम २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी याबरोबरच नाशिक, पुणे, मुंबई येथूनही निसर्गप्रेमींनी हजेरी लावली होती. निसर्गप्रेमींकडून भरून घेण्यात आलेल्या अभिप्रायांनुसार गणनेसाठी सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींनी निसर्गानुभव कार्यक्रम व त्याकरिता दिलेल्या सोईसुविधांबाबत संतुष्टता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सर्व मचाणींवर वन्यप्राण्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दर्शन घडले आहे. मचाणावर निसर्गप्रेमींना गणनेची माहिती भरण्याकरीता प्रपत्र देण्यात आले होते. रात्रभर जागे राहून पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांची नोंद निसर्गप्रेमीं कडून करण्यात आली. सदर नोंदीनुसार त्यांना ६० मचाणींवर एकुण ३७४ वन्यप्राण्यांचे दर्शन घडले आहे. त्याची माहिती सहपत्रीत केली आहे. मागील वर्षी ५४ मचानींवर एकूण ३०८ वन्यप्राण्याची नोंद करण्यात आली होती. निसर्गानुभव कार्यक्रम २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज २५ एप्रिल २०२३ पासून www.mahaforest.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आले होते. सामान्य नागरिकांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून त्यांना निसर्गाची अनुभूती घेता यावी, रात्रीचे जंगल, वन्य प्राण्यांचे आवाज, निशाचर प्राण्यांची वर्तणुक इत्यादी रंजक माहिती मिळावी या उद्देशाने या वर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे “निसर्गानुभव कार्यक्रम – २०२३ राबविण्यात आला होता.

०५ जानेवारी २०१० रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ हे ११६५.५७ चौ. किमी. आहे. व्याघ्र प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यात येतो. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा एकमेव आहे. येथील जंगल हे सह्याद्रीतील उर्वरीत घनदाट व चांगल्या श्रेणीतील शिल्लक राहिलेले जंगल आहे. पश्चिम महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या कोयना व वारणा जलाशयाचे गाळाने भरण्यापासून संरक्षण हे जंगल करीत आहे. १५ नद्यांचा उगम या जंगलातून होतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेले कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोने घोषित केलेले “जागतिक नैसर्गिक वारसास्थळ आहे. तसेच Birdlife International या जागतिक संस्थेने ‘Important Bird Area’ म्हणून घोषित केले आहे. येथील जैवविधतेसाठी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे.अशी महिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत यानी प्रसिद्धीपत्रकातून दिली.

वन्यप्राणी दर्शन

बिबट्या/फ्रेअर ३, भारतीय गौर गवा ११५, सांबर हरण १०, ठिपकेदार हरीण ४, जंगली कुत्रा ८, जंगली डुक्कर १०३, भारतीय हरे १, उंदीर हरण / पिसोरी गेळा २, बार्किंग डियर १५, आळशी अस्वल २०, लहान भारतीय सिव्हेट ४, राखाडी लंगूर ८, बोनेट मॅक ७, इंडियन क्रेस्टेड पोर्क्युपिन ३, भारतीय मुंगूस १, शेखरू १४, वटवाघूळ १ ,जंगली उंदीर १, एकूण-३१७

पक्षी प्रजाती दर्शन

ब्राह्मणी पतंग/आर १, स्परफाऊल १, रानकोंबडा ३१ , घुबड २, शिक्रा/टी १, घार २, बटेर ३, भारतीय मोर १३, सर्प गरुड / ड्रॅग १ एकूण पक्षी – ५७.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.