इन्शुरन्स क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या Icici लोंबार्ड मधील गेल्या १२ वर्षात ४ ते ५ कंत्राटदारांनी आणि व्यवस्थापनेने कामगारांची जी पिळवणूक केली होती त्या पिळवणूकिला आज खऱ्या अर्थाने मनसेच्या गजानन राणेंनी न्याय दिला..गेली अनेक वर्षे सातत्याने icici लोंबार्ड येथे कंत्राटदार बदलत होते, त्यामुळे कामगारांना ग्रॅज्यूईटीबाबत प्रश्न सातत्याने उद्भवत होता icici लोंबार्ड चे व्यवस्थापन दर ३/४ वर्षात कंत्राटदार बदलत त्यामुळे पूर्ण भारतभर असलेले कंत्राटी कामगारानां ग्रॅज्यूईटी गमवावी लागत होती.
आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे, मनकासे उपाध्यक्ष राज पार्टे व मनकासे शिष्टमंडळाने आज icici लोंबार्ड च्या प्रशासनाला मनसे स्टाईल दणका देताच आज त्यांच्या हक्काची ग्रॅज्यूईटी कामगारांना मिळणार असल्याचे लेखी आश्वासन व्यवस्थापनाने दिले, त्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान होते ते निव्वळ राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमुळेच..! अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना चिटणीस विजय निकम यांनी दिली.
कामगारांना न्याय मिळाला ही खराेखरच आनंदाची बातमी — POSITIVVE WATCH