अमित ठाकरे आजपासून दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर
तानाजी सावंत; विद्यार्थी संवादासह विविध कार्यक्रम
सांगली : प्रतिनिधी: ‘महासंपर्क’ अभियानांतर्गत महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे १ व २ फेब्रुवारी असे दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांशी ते थेट संवाद साधणार आहेत. याशिवाय मनसे विद्यार्थी संघटनेचा आढावा घेणार असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिली.
सावंत म्हणाले, ठाकरे यांचे संपूर्ण राज्यात महासंपर्क अभियान सुरू आहे. या अंतर्गत ते दोन दिवसांचा सांगली जिल्हा दौरा अंतिम झाला आहे. बुधवार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता इस्लामपूर येथे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांच्या तर सायंकाळी ७ वाजता आष्टा येथे शहर अध्यक्ष राजकुमार सावळवाडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय सायंकाळी ८ वाजता डिग्रज येथे विध्यार्थी सेनेचे जिलहध्यक्ष कृष्णा मोहिते यांचे संपर्क कार्यालयाचे उदघाटन ठाकरे यंव्हा हस्ते करण्यात येणार आहे.
रात्री १० वाजता त्यांचे सांगली शहरात स्वागत करण्यात येणार आहे. गुरुवार २ फेब्रुवारी रोजी माधवनगर रस्त्यावरील सर्किट हाऊस येथे विध्यार्थी सेनेचे पदाधिकारी तसेच विध्यार्थी यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. दुपारी तीन वाजता सांगली शहर जिल्हाध्यक्ष दयानंद मलपे व शहर पदाधिकारी यांच्यावतीने पुष्पराज चौक तर जिल्हाउपाध्यक्ष संदीप टेंगले यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर चौक येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
दुपारी सडे तीन वाजता मिरज येथे मनसे जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे उदघाटन, साडेचार वाजता तासगाव तालुका मनसे संपर्क कार्यालय भेट तर सायंकाळी ५ वाजता तासगाव येथे अमोल काळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
सायंकाळी ६ वाजता विटा येथे तालुकाध्यक्ष साजिद आगा यांचे संपर्क कार्यालय व डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तालमीस ठाकरे भेट देणार आहेत. तर सायंकाळी ७ वाजता टेलिकॉम सेनचे जिलहध्यक्ष संग्राम पाटणकर यांच्या वतीने नागज येथे ठाकरे यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मन सैनिक, मनसे पदाधिकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सावंत यांनी केले आहे.