सेवा संकल्प अभियान: गडहिंग्लजमध्ये १०३ जणांचे ‘लर्नर लायसन्स’

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर TEAM WATCH: प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत दि. 25 सप्टेंबर रोजी गडहिंग्लज येथे शिकाऊ अनुज्ञप्ती संदर्भातील नियमित शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात नागरिकांना शिकाऊ अनुज्ञप्ती मिळविण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच संबंधित नियम व तरतुदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींबाबत उमेदवारांना आवश्यक माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.या शिबिराचा एकूण 103 नागरिकांनी लाभ घेतला असून त्यांना शिकाऊ अनुज्ञप्तीची सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.