नवी दिल्ली (AICTE) यांची मान्यता
गारगोटी प्रतिनिधी – कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेली 2 वर्षापासून सुरू झालेल्या श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींग, पाल, ता.भुदरगड कॉलेजमध्ये डिप्लोमा इंजिनीअरींग विभागामध्ये आर्टीफिशल इंटेलिजन्स अँन्ड मशिन लर्निंग ची 60 वरुन 120 अशी प्रवेश क्षमता वाढीबरोबर नव्याने सिव्हील डिप्लोमा 60 प्रवेश क्षमतेस अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (AICTE) यांची मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी दिली आहे.
डिजिटल क्रांती घडवत असलेल्या एआय तंत्रज्ञानाचा वाढता वापर आयटी क्षेत्रात होत असल्याने एआयएमएल इंजिनिअर्सना प्राधान्य दिले जात आहे. तसेच, देशात वेगाने होत असलेल्या पायाभूत विकासामुळे सिव्हिल इंजिनिअर्सची मागणी वाढली आहे असून ही मागणी लक्षता घेता यावर्षीपासून हे दोन्ही कोर्स सुरू होत असल्याचे सांगितले.
आजच्या काळात दहावी नंतर डिप्लोमा इंजिनीअरींग हा करिअरचा एक उत्तम पर्याय आहे. राज्यशासनाने मुलींना मोफत शिक्षण व विद्यार्थ्यांना फी सवलत उपलब्ध करून दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश मार्गदर्शन केंद्र सुरू केले असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य उमेश पाटील यांनी केले आहे.























































