जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने रॅलीचे आयोजन…
कोल्हापूर – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर विभाग आणि स्केटिंग जिल्हा स्केटिंग असोसिएशनच्या शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्र व राजश्री छत्रपती शाहू महाराज स्केटिंग केंद्राच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज दिनांक ५ जून रोजी बाल स्केटिंग चमुच्या पर्यावरण संदेश स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले.
स्केटिंग ची सुरुवात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे व उप प्रादेशिक अधिकारी श्री. मोरे (साहेब) यांच्या हस्ते व उदय गायकवाड व सौ. अरुणा आणि महाराष्ट्र राज्य स्केटिंग संघटना उपाध्यक्ष प्रा. डॉ. महेश कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उद्योग भवन कोल्हापूर येथून या रॅलीची सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गाने फिरून ही रॅली महावीर उद्यान या ठिकाणी आणण्यात आली. या ठिकाणी बाल स्केटिंगपटूं व पालकांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे हे २३वे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व पालक व बाल स्केटिंग पटुनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली.
“पर्यावरणाचा करूया सन्मान हेच आपल्यासाठी वरदान” “कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी” “काम करा लाखमोलाचे “निसर्ग संवर्धनाचे” “पाणी आडवा “पाणी जिरवा” ” झाडे लावा” “झाडे जगवा” अशा आशयाचे हातामध्ये फलक घेऊन राष्ट्रीय संदेश मुलांनी फलक द्वारे दिले. दोन ते पंधरा वर्षाच्या मुलांनी-मुलींनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. रॅलीचे संयोजन कपिल पाटील, तेजस्विनी कदम, संदीप पवार, ॲड. धनश्री कदम, भास्कर कदम यांनी केले.