“शारीरिक शिक्षण.”या विषयातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने पी. एच. डी.
कोल्हापूर – आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक आणि न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे जिमखाना विभाग प्रमुख प्रा. महेश अभिमन्यू कदम यांना “शारीरिक शिक्षण.”या विषयातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने पी. एच. डी. पदवी घोषित करण्यात आली आहे.
प्रा. महेश कदम यांनी “पश्चिम महाराष्ट्रातील रोलर स्केटिंग या खेळाची सध्य: स्थिती व त्याच्या वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनेचा चिकित्सक अभ्यास “या विषयावरील प्रबंध नांदेड विद्यापीठाकडे सादर केला होता. रोलर स्केटिंग खेळावर संपूर्ण भारतामध्ये प्रथमच महेश कदम यांच्या वतीने प्रबंध सादर करण्यात आला होता. त्यामुळे महेश कदम यांचे विद्यापीठाच्या वतीने विशेष कौतुक केले आहे. रोलर स्केटिंग खेळावर संपूर्ण भारतातील विद्यापीठस्तरावर शारीरिक शिक्षण विषयातून संशोधक अभ्यासामध्ये पी. एच. डी. करणारे महेश कदम हे भारतातील पहिले संशोधक ठरले आहेत. अमेरिका येथेही झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक पात्र परीक्षेतही महेश कदम यांनी स्केटिंग वरील शोध प्रबंध सादर केला होता. ती ही परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत. अमेरिकेतही त्यांना परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून सन्मानित केले होते.
त्यांना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री नाम. मा. चंद्रकांत (दादा) पाटील संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे. संस्थेचे सी. ई. ओ. श्री. कौस्तुभ गावडे संशोधक मार्गदर्शक डॉ. सौ. संगीता संगावार(नांदेड), डॉ. दिलीप भडके(देगलूर), डॉ. प्रदीप देशमुख(लातूर), प्रा. जयंत पाटील, विजय सोनवणे (नांदेड) डॉ. विनायक भागवत, नंदू देसाई, यांचे मार्गदर्शन लाभले.