ELECTION हेरले येथे दलित मित्र अशोकराव माने यांच्या महाजनादेश पद यात्रेचे अभूतपूर्व स्वागत

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
काेल्हापूर- (रुपेश आठवले)ः  हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे महाजनादेश यात्रेनिमित्त हेरले येथे भेट दिली. गावामध्ये अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले. तसेच महिलांनी औक्षण करून दलित मित्र अशोकराव माने यांचे आवाडे गटाचे आदगोंडा पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पद यात्रेची सुरुवात राम मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाली. ही पदयात्रा दलित वस्तीमध्ये असणाऱ्या समाज मंदिर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुढे सुरु झाली. त्यानंतर ती पदयात्रा गावांमधील असणारे हनुमान मंदिर बिरोबा मंदिर, साई मंदिर, भैरबामंदिर, म्हसोबा मंदिर, अष्टविनायक मंदिर अशा सर्व मंदीराना भेटी देऊन पुढे मार्गस्थ झाली. यावेळी अशाेकराव माने यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या निवडणुकीच्या विजयासाठी शुभशिर्वाद घेतले.
हा पदयात्रा वार्ड नंबर सहा मध्ये येऊन तेथे अनुसूचित जाती जमातीचे तालुकाध्यक्ष विनोद कुरणे यांनी  अशाेकराव माने यांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.  या पदयात्रेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.  यावेळी  विजयी करण्याचा निर्धार उपस्थितांनी केला. अशोकराव माने यांनी तेथील जमलेला नागरिकांना मला निवडून देण्याचे आवाहन केले. हातकणंगले तालुक्यातील सर्व कामे सोडवण्याच्या आश्वासन यावेळी अशाेकराव माने यांनी दिले. भारतीय जनता पार्टीचे शाखा हेरले अध्यक्ष विश्वजीत भोसले, कलाप्पा आवाडे, साखर कारखान्याचे आदगोंडा पाटील, शिवसेना शिंदे गटाचे सयाजीराव गायकवाड,  अविनाश बनगे,  अमोल मोहिते, बाबासो चौगुले ,संदीप मुंडे, बिपिन आलमान, सुधीर परमाज सचिन तेरदाळे, प्रशांत माळी, विनोद कुरणे, बाबासो कुरणे, शशिकांत शिंगे, श्रीकांत कुरणे, भाजप महिला आघाडीच्या पूजा माने, व सविता माने तसेच आरपीआय आठवले गटाचे श्रीकांत मालेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर येथे रँलीची सांगता झाली. 
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.