WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

शिक्षण व कृषी क्षेत्राची आवड असणाऱ्या पिढीला डी वाय पाटील ग्रुपने नवी दृष्टी दिली – शरद पवार

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची तळसंदेतील डी वाय पाटील एज्युकेशनल सिटीला भेट…

कोल्हापूर – कृषी क्षेत्र व उच्च शिक्षणाची आस्था असलेल्या कोल्हापूरातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील नव्या पिढीला एक दृष्टी देण्याचे काम डी. वाय. पाटील ग्रुपने केले आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी तळसंदे येथे काढले.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार शरद पवार यांनी बुधवारी दुपारी तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटीला भेट दिली. डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के‌. गुप्ता, डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के प्रथापन, फार्म हेड प्रा. अमोल गाताडे यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य व प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांनी संवाद साधताना पवार पुढे म्हणाले, हिंदूस्थानात इंडियन कौन्सील ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च ही संस्था कृषी क्षेत्रात देशभरात संशोधनाचे काम करते. या संस्थेची ८० संशोधन केंद्रे आहेत. याच धर्तीवर डी. वाय. पाटील ग्रुप आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून परीसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधायुक्त शिक्षण देण्याचे काम गेली अनेक वर्षे करीत आहे. डी. वाय. पाटील ग्रुपने केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतीची आस्था आणि शिक्षणाची आवड असणाऱ्या नव्या पिढीला दृष्टी देण्याचे काम केले आहे. डी. वाय पाटील ग्रुपचा असाच विस्तार आणि प्रगती होवो, अशा शुभेच्छा श्री. पवार यांनी दिल्या.

डॉ. संजय डी. पाटील यांनी तळसंदे येथे सुरू असलेली विविध महाविद्यालये व प्रकल्पांची माहिती श्री पवार यांना दिली. डी वाय पाटील डेअरी फार्म व मुक्त गोठा पाहून श्री पवार अतिशय प्रभावीत झाले. येथील विविध गाई व म्हशींच्या जातींबद्दल व कृषी पदार्थांबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी डॉ. संजय डी पाटील व प्रा. गाताडे यांच्याकडून जाणून घेतली. स्मृती उद्यान येथील यशवंतराव भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पवार यांनी अभिवादन केले. यावेळी डी. वाय कृषी व तंत्र विद्यापीठाच्या प्रांगणात श्री शरद पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कृषी महाविद्यालयाच्या न्यूज लेटरचे प्रकाशनही पवार यांच्या हस्ते झाले.

शरद पवार यांच्या हस्तेच ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन झालेल्या डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ त्याच्या तीन वर्षांच्या यशस्वी कामगिरीची माहिती प्रेझेंटेशनद्वारे कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी यावेळी दिली. यावेळी पवार यांनी कृषी मधील नवीन तंत्रज्ञान नवीन अभ्यासक्रम याबद्दल प्रश्न विचारून नव्या अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. पवार यांनी यावेळी कृषी अभियांत्रिकी, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र टेक्निकल कॅम्पस येथे भेट दिली.

डॉ. संजय डी.पाटील यांच्या निवासस्थानी माजी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांची भेट घेतली. यावेळी यावेळी ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांनी श्री पवार यांना डी वाय पाटील ग्रुप विस्तार, विविध संस्था व कार्याची माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली. कार्याचीसौ शांतादेवी डी. पाटील, सौ पूजा ऋतुराज पाटील, सौ वृषाली पृथ्वीराज पाटील, व्ही. बी पाटील, माजी कुलगुरू डॉ. शैलेश पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, डी.एन शेलार, प्रा. पी एस पाटील, डॉ. जयेंद्र खोत, डॉ. व्ही. व्ही. भोसले, सुजित सरनाईक, प्राचार्य डॉ.महादेव नरके, डॉ. आर. के. शर्मा, डॉ. शिम्पा शर्मा, डॉ. अजित पाटील, डॉ. उमाराणी, यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य विभाग प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.