आमदार सतेज पाटील यांनी दाखवलेली ही तत्परता लोकांना भावली…
कोल्हापूर – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. साने गुरुजी वसाहत परिसरात माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या वाढदिवस कार्यक्रमासाठी रात्री साडेसात वाजता जाताना आमदार सतेज पाटील हे रामानंदनगर चौकातील गर्दी पाहून स्वतः गाडीतून खाली उतरले. आणि त्यांनी ट्रॅफिक सुरळीत करण्यास सुरुवात केली.
काही वेळातच त्यांचे कार्यकर्ते दुर्वास कदम (बापू), मॉन्टी मगदूम आणि सतीश जाधव (एस. के.) हे सुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला. थोड्या वेळाने पाच ते सहा पोलीस सुद्धा या ठिकाणी येऊन तेसुद्धा कार्यरत झाले.
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.