द्वारका : देशभरात दसऱ्याची तयारी जोरात सुरू असून, यंदा १२ ऑक्टोबरला विजयादशमी साजरी होणार आहे. दिल्लीतील द्वारका येथील सेक्टर १० येथील रामलीला मैदानावर दसऱ्याच्या दिवशी जगातील सर्वात मोठ्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. त्याची उंची २११ फूट असल्याचे सांगितले जाते. ते तयार करण्यासाठी सुमारे चार महिने लागले. तीस लाख रुपये खर्चून तयार करण्यात आली आहे.
द्वारका रामलीला समितीचे संयोजक राजेश गेहलोत यांनी सांगितले की, यावर्षी सेक्टर १० येथील द्वारका रामलीला सोसायटीमध्ये जगातील सर्वात उंच आणि भव्य रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. त्याची उंची २११ फूट असून तो काही खास काारागिरांमार्फत बनविण्यात आला आहे. हे कारागीर अंबाला आणि एनसीआर येथील आहेत. पुतळ्याची रचना प्रथम लोखंडाची होती, नंतर त्यावर बांबू आणि मखमली कापड वापरण्यात आले होते. रावणाचा चेहरा अतिशय सुंदर आणि मजबूत बनविण्यात आला आहे, जो चार मोठ्या क्रेनच्या मदतीने उभारण्यात आला आहे. हा पुतळा बनवण्यासाठी सुमारे ४ महिने लागले आणि ३० लाख रुपये खर्च आला.