पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामगीता मधील मतदान जनजागृतीचे विचार आजही आदर्शवत – जिल्हाधिकारी अमोल येडगे
मँगो एफ एम कार्यालयात मतदार जनजागृती विशेष अंकाचे प्रकाशन आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
कोल्हापूर : सजग नागरिक म्हणून जबाबदारीने सामाजिक जीवनात कार्य करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील विचार हे नेहमीच सर्वांना आदर्श होत आहेत. त्या मधीलच मतदारांना इशारा म्हणून ‘एक एक मत लाखमोलाचे – मत हे दुधारी तलवार, त्याची लावावी कसोटी सुंदर – सावधपणे’ हे व्यक्त केलेले विचार आजही सर्वत्र तंतोतंत लागू पडतात. त्याचा प्रसार व्यापकतेने व्हावा यासाठी दैनिक सिंधुदुर्ग समाचार – मँगो एफ एम परिवाराचा उपक्रम नक्कीच सर्वत्र अनुकरणीय आहे अशा शब्दात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या हस्ते मॅंगो एफएम कार्यालयात सिंधुदुर्ग समाचारच्या मतदान जनजागृती आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मतदारांना इशारा या ग्रामगीतेतील विशेष विचारधाराचे प्रकाशन करण्यात आले .
प्रारंभी सर्वांची स्वागत पुस्तके देऊन संपादक आशिष भाऊसाहेब कदम यांनी केले तर आपल्या प्रास्ताविकात ज्येष्ठ पत्रकार लेखक चंद्रकांत पाटील यांनी सिंधुदुर्ग समाचार परिवाराने नेहमीच विविध कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे, दरवर्षी मध्यवर्ती बस स्थानकात रक्षाबंधन दिवशी पर गावातून मुक्कामास असलेल्या वाहक चालकांना भावपूर्ण वातावरणात राख्या बांधण्यापासून ते आजच्या मतदार जनजागृती अभियानापर्यंत विविध उपक्रमात त्यांचे सातत्य कायम आहे यामध्ये सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी येडगे यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संदीप पाटील, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, शशिकांत पाटील, आरोग्य मित्र राजेंद्र मकोटे, महावीर कॉलेज एनसीसी विभागाचे डॉक्टर अंकुश धनसोडे आदी मान्यवरांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यास जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे अमर पाटील, जयसिंग हवालदार यांच्यासह कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर तालुका स्तरावरील विविध महाविद्यालय तसेच सामाजिक संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणी या विशेषांकाचे वितरण या मतदान जनजागृती विषय संघाचे वितरण करण्याचाही मनोदय यावेळी संपादक आशिष कदम यांनी व्यक्त केला. शेवटी राजेंद्र मकोटे यांनी आभार मानले.

|
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 260