धक्कादायक..विद्यार्थ्यांमध्ये विषबाधा; 15 जणांवर उपचार सुरु- कुरुंदवाडमध्ये घडला हा प्रकार, वाचा सविस्तर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कुरुंदवाड येथील सैनिकी निवासी पॅटर्न शाळेतील 38 जणांना जेवणातून विष बांधा

14 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज , 6 कर्मचाऱ्यांच्यासह 15 विद्यार्थ्यांच्यावर उपचार सुरू

काेल्हापूर :  धक्कादायक, कुरुंदवाड येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सैनिकी निवासी पॅटर्न शाळेत विषबाधा झालीय. 34 विद्यार्थी 2 शिक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांना रविवार सायंकाळी अचानक पोटात दुखून जुलाब,उलटी मळमळ असा प्रकार सुरू झाल्यानंतर त्यांना विषबाधा झाल्याचे समाेर आले. त्या सर्वांना तात्काळ सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. रविवारी दुपारी झालेल्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती डॉ. रेखा तराळ यांनी दिली.औषध प्रशासन अधिकारी महेश मासाळ यांनी हॉस्पिटल मध्ये सोमवारी सकाळी भेट देऊन अहवाल तयार करायला सुरुवात केली आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर कुरुंदवाड शहर डॉक्टर असोसिएशनच्या शहरातील सर्व डॉक्टरांनी सिद्धिविनायक हॉस्पिटलात धाव घेऊन विद्यार्थ्यांच्यावर उपचार सुरू केले. कुरुंदवाड येथील सैनिकी निवासी शाळेमध्ये रविवारी दुपारी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जेवणाबरोबर बासुंदी देण्यात आली होती.सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना अचानक पोटात दुखून मळमळ ,उलटी, जुलाब आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आणि अशक्तपणा येऊ लागल्याने 34 मुलांना असा त्रास सुरू झाला त्याचबरोबर 2 शिक्षक आणि 2 कर्मचाऱ्यांना हा त्रास जाणवू लागला. त्यांना सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मुलांची संख्या जास्त असल्याने डॉ.किरण अनुजे,डॉ.सारंग कोकाटे यांच्यासह नर्सिंग स्टाफची धावपळ सुरू झाली. बधितांची संख्या जास्त असल्याने.

डॉ.अनुजे यांनी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश पट्टेकरी यांना  माहिती दिली. यावेळी सुट्टीचा दिवस असूनही तत्काळ, शहरातील डॉ.धनंजय पाटील,डॉ.आर.एस.पाटील,डॉ.फल्ले,, डॉ. कुलकर्णी, डॉ.उमेश लंबेसह सर्वच डॉक्टर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आणि विद्यार्थ्यांच्यावर उपचार सुरू केले.त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर हाेण्यास मदत मिळाली. 

सैनिकी पॅटर्न निवासी शाळेतील 34 विध्यार्थी,2 शिक्षक,2कर्मचाऱ्यांना दुपारी जेवणात बासुंदी खाल्ली होती.त्यातून हा विषबाध्याचा प्रकार घडला आहे. सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या वर उपचार सुरू असून याबाबतची जिल्हा वैद्यकीय अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असल्याचे डॉक्टर रेखा तराळ यांनी सांगितले.

सैनिकी पॅटर्न निवासी शाळेतील 34 विद्यार्थी दोन शिक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांना गॅस्ट्रो सदृश्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते.दुपारच्या जेवणावेळी एकत्रित जेवण करत असताना शरीरात नवीन रोग निर्माण करणाऱ्या जीवांच्या संपर्कात आल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी तयार होते आणि अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते.असाच प्रकार असल्याचे डॉ.किरण अनुजे,डॉ.सारंग कोकाटे यांनी सांगितले.

या सैनिकी निवासी शाळेत मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सोलापूर जिल्ह्यातील 34 विद्यार्थ्यांना विषबाधा झाला आहे. 14 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून 6 कर्मचारी आणि 15विद्यार्थ्यांच्या वर अशा एकूण 21 जनांच्यावर उपचार सुरू आहेत.याबाबत चेअरमन प्रा.शरदचंद्र पराडकर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी दुपारच्या सत्रात जेवनानंतर जादा पाणी पिल्याने हा प्रकार घडला आहे.आता मुलांची प्रकृती स्थिर आहे असे सांगितले.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.