आजच वेळ राखून ठेवा- ‘दिलखुलास’ मध्ये संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाविषयी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील काय म्हणतात ऐका

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मुंबई, TEAM WATCH : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, मानव-वन्यजीव संघर्ष, जैवविविधतेचे जतन आणि वनपर्यटन’ या विषयावर कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार, १२, मंगळवार १३ आणि बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ ॲपवर प्रसारित होणार आहे. मुलाखत कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील यांनी घेतली आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

या मुलाखतीत वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित उपक्रम, वृक्षलागवड व वनसंवर्धन, वन्यजीवांची शिकार रोखण्यासाठी करण्यात येणारी उपाययोजना आणि वन्यजीव संरक्षणासाठी नागरिकांचा सहभाग या विषयांवर माहिती देण्यात आली आहे. तसेच मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाची कारणे, वन्य प्राणी मानवी वस्तीत आढळल्यास नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी, वनपर्यटनाचे महत्व तसेच भुदरगड तालुक्यातील सवतकडा धबधबा परिसरातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांशी संबंधित बाबींचाही या मुलाखतीत समावेश आहे.

वनसंवर्धनात स्थानिक नागरिक आणि समित्यांची भूमिका, जंगलातील वणव्यांना प्रतिबंध करण्यासाठी घ्यावयाची काळजी, दुर्मिळ वनस्पती, पक्षी व वन्यजीवांचे संरक्षण आणि निसर्गसंपदा व जैवविविधतेचे जतन याविषयी दिलखुलास मधील या मुलाखतीत उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची जबाबदारी आणि वनसंवर्धनातील लोकसहभागाचे महत्व यावरही यावेळी चर्चा करण्यात आली आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.