राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी मोठा निर्णय!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी १ नोव्हेंबरपासून ‘आरोग्य संवाद यात्रा’! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर सुमारे १० लाख नागरिक, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य समिती सदस्यांशी थेट संवाद साधून अभिप्राय जाणून घेणार.

 

राज्यातील सुमारे 10 लाख आरोग्य समिती सदस्य, लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिकांशी आरोग्यमंत्री साधणार संवाद

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

मुंबई – राज्यातील आरोग्य सेवेत लोकसहभाग वाढवने, सेवेची गुणवत्ता, पारदर्शकता, व विविध योजनांची अधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी, थेट जनतेला भेटुन अभिप्राय व सुचना जाणून घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिनांक 01 नोव्हेंबर पासून 05 डिसेंबर पर्यंत राज्यभर “आरोग्य संवाद यात्रा” आयोजित केली आहे. 

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही सामान्य माणसाला मोठा आधार आहे. ती अधिक सक्षम, गुणवत्ता पूर्ण व लोकाभिमुख करण्याचा शासनाचा निर्धार असुन, आरोग्यसेवेत लोक सहभाग वाढवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रथमच “आरोग्य संवाद यात्रा” आयोजित करण्यात आली आहे. या माध्यमातून आरोग्यमंत्री जनतेशी थेट संवाद साधून आरोग्य व्यवस्थेबद्दल जनमताचा कानोसा घेवुन स्थानिक लोकप्रतिनिधी व आरोग्य समिति सहभागाने आरोग्यसुविधा मजबूत करण्यात येणार आहे.

या “आरोग्य संवाद” यात्रेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त , संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, व सर्व आरोग्य योजनांचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत. या आरोग्य संवाद यात्रे दरम्यान ग्रामपंचायत स्तरावरील उपकेंद्रा पासून ते ग्रामीण रुग्णालय , उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालये, पालिका रुग्णालये, स्त्री रुग्णालये, मनोरुग्णाये व विशेष रुग्णालया पर्यंतच्या सर्व आरोग्य संस्थांच्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेण्यात येणार आहे. 

यात्रेदरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा, तालुका, महापालिका, व गाव पातळीवरील सुमारे 10 लाख आरोग्य समिती सदस्य व सर्वसामान्य नागरिकांशी आरोग्यमंत्री संवाद साधणार आहेत. आरोग्य समितीने सादर केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने 5 डिसेंबर नंतर राज्यस्तरावर बैठक संपन्न होणार आहे. या यात्रेत प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे व दोन ग्रामीण रुग्णालयाला आरोग्यमंत्री अचानक भेट देऊन कामकाजाचा आढावा घेऊन संवाद देखील साधणार आहेत. 

आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत, जिल्हा स्तरापासून, गाव पातळीवरील उपकेंद्र स्तरापर्यंतच्या सर्व आरोग्य समिती सदस्यांच्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्यमंत्री खाजगी वैद्यकीय व्यवसायिकाशी सुध्दा संवाद साधणार आहेत. या सर्व बैठकांमधील अभिप्राय व सूचना घेतल्या जाणार असुन, यात्रेची सांगता झाल्यावर, माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत राज्यस्तरीय आरोग्य समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे  

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने व्यक्तीच्या जन्माअगोदर प्रसूतिपूर्व सुविधा पासून ते मृत्यू पश्चात शवविच्छेदना पर्यन्त नागरिकाना आरोग्यसेवा दिल्या जातात. राज्यात एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, मोफत महाडायलेसिस, एमआरआय, सिटि स्कॅन, स्टेमी, पॅलेटिव्ह केअर, टेलिमेडीसीन, मोफत रक्त चाचण्या, आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा (102,108), पीएम-राहत, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, माहेरघर, मानसिक आरोग्य समुपदेशन या सारख्या अनेक लोकहिताच्या योजनाची जनतेला माहिती व्हावी. जेणेकरून जास्तीत जास्त गरजू रुग्णांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी संवाद यात्रेदरम्यान सर्व आरोग्य योजनांचा प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार असून आरोग्य योजनांचे प्रमुख अधिकारी संवाद यात्रेत सहभागी होणार आहेत.  

निरोगी, सशक्त व आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडवण्याच्या ध्येयाने माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे मार्गदर्शनाखाली “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियान सुरु केले असुन, Precaution is Better than cure या उक्ती नुसार आजार होवू नये यासाठी रोगराई प्रतिबंधात्मक उपाययोजना, सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण, आरोग्यदायी जीवनशैली याबाबतचे प्रबोधन, व आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहित आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिका पर्यंत पोहोचवण्यात येणार आहॆ. सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देऊन, आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने ही यात्रा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.