उन्हाळ्याची चाहूल लागलेली असतांनाच,आज सकाळी-सकाळी मस्तपैकी पहाटेच्या थंडगार हवेतून प्रवास करायला भारी वाटले. खांद्याचे ऑपरेशन माहीत असलेने, गाडीने मला जास्त गतीने जाण्याचा आगाऊपणा करून दिला नाही. गैबीच्या चौकातील कोपऱ्यावरील टपरीत विजय माझी वाट पहात बसलेला.
कढईत गरमागरम भजी,अंगाला झोंबलेलं गार वारं. गाडी रस्त्याकडेला लावून पायांनी मला आत नेऊन बसवले. तोंडा-भजीची गाठ भेट झाली आणि आम्ही काळम्मावाडीच्या त्या सुपीक खोऱ्यातील फराळे या थोड्या आडवाटेच्या अशा सुंदर गावात प्रवेश केला. घटमाथ्यावर असूनही कोकणी साज चढवलेले हे गाव. अगोदरच संपर्क झाला असलेने पोरं वाटच बघत होती.गल्लीच्या एका वळणावर असलेली शाळा. व्हरांड्यातच छोट्या चटया अंथरुण शांतपणे मुलं वाचन करत होती. आमच्या प्रवेशाने त्यांच्या अभ्यासात व्यत्यय आला.( तो येणारच होता ) झालं, नेहमीप्रमाणे मुलांशी संवाद झाला आणि सिनेमा सुरु.सिनेमाचा किती सकारात्मक परिणाम होतो मुलांवर,हे नंतर मुलांच्या प्रतिक्रियेवरून लक्षात आले. ” परत यायच का रे, सिनेमा दाखवायला ?” या मॅक्सया प्रश्नावर जोराचा हो आला.पोरं खुश… आपुनबी खुश…
सकाळच्या पहारातील अशीही फाेटाेग्राफी… मिलींद यादव यांच्या फाेटाेग्राफीतून…
सुंदरता निसर्गांची.. आकर्षण फुलांचे- मिलींद यादव यांच्याच नजरेतून आकर्षक छायाचित्र पहा
नक्की वाचा… रांगड्या शाहुवाडीचे दर्शन! धार्मिक शक्ती पीठ-आई जुगाई देवी व लोळजाई देवी
![]() ![]() |
![]() ![]() |