सर्वोत्तम प्रभावी सामाजिक कार्यासाठी
“मुक्ती वुमन अचिव्हर अवॉर्ड्स” ने पत्रकार शीतल करदेकर सन्मानित
अमली पदार्थांचे सेवन, एचआयव्ही/एड्स, महिला आणि बालकल्याण तसेच कला आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये गेल्या २५ वर्षांपासून अथकपणे काम करणाऱ्या स्मिता ठाकरे यांच्या मुक्ती फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांना मुक्ती वीर नारी पुरस्कार आणि सामाजिक प्रभावातील उत्कृष्टतेसाठी मुक्ती महिला अचिव्हर पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
पत्रकारितेसह सामाजिक क्षेत्रातील प्रभावी योगदानासाठी वृत्तमानस’च्या विशेष प्रतिनिधी शीतल करदेकर यांना मुंबई च्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर याच्या हस्ते मुक्ती वुमन अचिव्हर अवॉर्ड्स देऊन सर्वप्रथम सन्मानित करण्यात आले!
त्याप्रसंगी शीतल करदेकर यांनी पुरस्कारासाठी मुक्ति फाऊंडेशन व स्मिता ठाकरे यांचे तसेच अर्चना नेवरेकर यांचे आभार मानून आवाहन केले की, “पत्रकार नेहमीच समाजासठी लिहितात ,बोलतात मात्र आता माध्यमकर्मीना समाजाच्या पाठिंब्याची गरज आहे! मुख्यमंत्र्यांनाही हीच विनंती आहे की,व्यापक व सर्वसमावेशक भूमिकेतून काम व्हावे! जर आम्ही मागणी केल्यावर चित्रपट नाटक रंगकर्मीसाठी महामंडळ बनते तर आम्हा पत्रकार व सर्व माध्यमकर्मीसाठी का होऊ शकत नाही? पत्रकार म्हणून पत्रकारांची ओळख होण्यासाठी पत्रकार रजिस्ट्रार व्हावे,जेणेकरुन या क्षेत्रातील घुसखोरी रोखली जाईल, सर्व योजनांचा लाभ सर्व पत्रकारना होईल सन्मान योजना सुधारणा,धोरण, त्रिपक्षिय समिती करता येतील! “
निर्मला सामंत प्रभावळकर यांनी तत्काल सहकार्याचा हात पुढे करून आम्ही आपल्या सोबत आहोत असे आश्वासन दिले.
“आमचा विश्वास आहे की महिला महिलांना सक्षम बनवतात, म्हणून आमच्याकडे विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिला इतर यशस्वी लोकांना पुरस्कारदेण्यासाठी आहेत.आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, कारण भारतातील बहुसंख्य महिलांत शिक्षणाचा अभाव, कुपोषण, घरगुती हिंसाचार, बालविवाह, बालमजुरी, स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी, घरात आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक भेदभाव यासारख्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे” अशी भावना या प्रसंगी स्मिता ठाकरे यांनी व्यक्त केली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले, मुक्ति फाऊंडेशन च्या व स्मिता ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करून अशा कामासाठी आपले नेहमीच सहकार्य राहील अशी भावना व्यक्त केली.
मुक्ती वुमन अचिव्हर अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन सोशल इम्पॅक्ट , पत्रकार शीतल करदेकर, अंकिता वर्मा, डॉ तृप्ती गिलाडा, अनिता पीटर, अॅड. प्रिया शाह, लेफ्टनंट सिडीआर तनु, मेजर दिव्या आदिती नायक, लता घनशामणी, , सर्जन सिडिआर शाझिया खान आणि डॉ अनुषा श्रीनिवासन अय्यर यांना सन्मानित करण्यात आले. |
अनुपम खेर, दुलारी खेर, रवीना टंडन, वीर सेनानी फाउंडेशन, मंजू लोढा, अरुणा इराणी, मेजर जनरल एच.एस. काहलॉन, मेजर जनरल विक्रांत नाईक आणि अलाया एफ हे सन्माननीय पाहुणे होते.
मुक्ती वीर नारी पुरस्कार पूनम चंद्रकांत जाधव, प्रियांका नीलेश खोत, सुषमा संग्राम फडतरे, संकपाल मयुरी अनिल, उज्वला संजय माने, मुळे अश्विनी मच्छिंद्र, प्रेमला सचिन जाधव, नंदा दिलीप पडवळ, राणी सुधीर निकम, किरणनाथ सोंडे, सुधीर निकम यांना प्रदान करण्यात आला. मांधरे – लष्करातील शहीदांचे कुटुंबातील सर्व सदस्य.
सामाजिक संस्काराचे बीज रूजवावेच लागेल …