WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

भविष्यातील 25 वर्षांचा विचार करुन विकास योजना राबवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इचलकरंजी महानगरपालिकेला सूचना

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विविध विभागांच्या सचिवांशी बैठकीतूनच फोनवर संवाद साधत प्रस्तावांवर जलद कार्यवाही करण्याच्या दिल्या सूचना… शाश्वत विकासावर भर देऊन दर्जेदार कामे करा…

कोल्हापूर – इचलकरंजी महानगरपालिकेने भविष्यातील 20 ते 25 वर्षांचा विचार करुन विकास योजना राबवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. इचलकरंजी महानगरपालिकेतील विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या सभागृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा कोल्हे – शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले तसेच महसूल व महानगरपालिकेतील अधिकारी उपस्थित होते. खासदार धैर्यशील माने दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले.

नागरिकांचे हित साधताना शाश्वत विकासावर भर देऊन दर्जेदार पद्धतीने कामे करा, अशा सूचना देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वस्तू व सेवा कर प्रतिपूर्ती अनुदानाचे वितरण होणे आवश्यक असणाऱ्या राज्यातील इचलकरंजीसह अन्य महानगरपालिकांनाही या अनुदानाचे वितरण होण्यासाठी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात येईल.
इचलकरंजी महानगरपालिकेसाठी आवश्यक असणारे अग्निशमन वाहन खरेदीच्या प्रस्तावाला तात्काळ मान्यता देण्याच्या सूचना नगरविकास विभागाचे मुख्य सचिव गोविंदराज यांना त्यांनी बैठकीतूनच फोनद्वारे दिल्या.

पंचगंगा घाटाच्या सुशोभीकरणाचे काम दर्जेदार होण्यासाठी चांगला कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करा. शक्य असल्यास घाटाचे बांधकाम आरसीसी मध्ये करा, जेणेकरुन नदी घाटावरील दगड मोकळे होणार नाहीत. इचलकरंजी प्रवेशद्वार उभारताना या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची उंची लक्षात घेऊन त्या दृष्टीने प्रवेशद्वाराचे डिझाईन बनवा. तसेच भाजी मार्केट व अन्य नवीन इमारतींचा बांधकाम आराखडा बनवताना व्यापारी व स्थानिक नागरिकांचा विचार करा, असे त्यांनी सांगितले. नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना गतीने राबवा, अशा सूचना देऊन आरोग्य, शिक्षण, अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आदी बाबतीत महानगरपालिकेने लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्या त्या विभागांच्या सचिवांशी बैठकी मधूनच फोनवर बोलून संबंधित प्रस्तावांवर आवश्यक ती कार्यवाही करुन मंजुरी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

इचलकरंजी महानगरपालिकेला वस्तू व सेवा कर प्रतिपूर्ती अनुदानाचे वितरण व्हावे. पंचगंगा नदी बारमाही प्रवाहित ठेवावी , जेणेकरुन हातकणंगले व शिरोळ तालुक्यामध्ये पाणीटंचाई भासणार नाही तसेच नदी प्रदूषणही रोखले जाईल. तसेच अमृत योजनेअंतर्गत मोठ्या तळ्याच्या पुनरुज्जीवनासाठी तसेच कट्टी मुळा पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाच्या वतीने निधी उपलब्ध व्हावा, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनना साठीचा प्रलंबित निधी लवकरात लवकर मेळावा, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार राहुल आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रशासक अमोल येडगे व आयुक्त पल्लवी पाटील यांनी इचलकरंजी महानगरपालिकेतील कामांच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.