विनायक जितकर
डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक मध्ये
५ एप्रिल रोजी राज्यस्तरीय ‘टेक्नोवा’ स्पर्धा
कसबा बावडा : येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये ५ एप्रिल रोजी राज्यस्तरीय ‘टेक्नोवा’ ही टेक्निकल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी ५० हजार रुपयांची बक्षिसे ठेवली असून पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याला वाव मिळावा यासाठी डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने राज्यस्तरीय ‘टेक्नोवा’ या तांत्रिक स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यावर्षी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये टेक रिक्रूटमेंट, सी टेक, क्ले कार मॉडेलिंग, ग्राफीनोव्हा, प्रोजेक्ट कॉम्पिटीशन, स्क्रीन बॅटल आणि प्रेझेंट टेक यांचा समावेश केलेला आहे. विजयी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि रोख बक्षिस दिले जाणार आहे. क्रीडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष राजीव परिख यांच्या हस्ते आणि संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. |