WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला इटलीचा प्रतिष्ठित ए’ डिझाईन पुरस्कार…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

डिझाईन ए’ पुरस्कारासोबत डॉ. संजय डी पाटील, केतन जावडेकर, पृथ्वीराज पाटील, डॉ. ए. के. गुप्ता.

कोल्हापूर – डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेला इटलीतील प्रतिष्ठित ‘ए’ डिझाईन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाला बहुविद्याशाखीय आणि आंतरविद्याशाखीय डिझाइन श्रेणीसाठी हा सन्मान मिळाला आहे. नाविन्यपूर्ण, सर्वांगीण आणि टिकाऊ डिझाइनसाठीच्या वचनबद्धतेचा हा गौरव असल्याची माहिती कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.

‘ए’ डिझाईन अवॉर्ड हा डिझाईन आणि इनोव्हेशनमधील उत्कृष्टतेचा दीपस्तंभ आहे. जागतिक स्तरावर डिझाईन क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. डिझाईन आणि इनोव्हेशन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील 40 ज्युरी सदस्यांच्या पॅनेलने विद्यापीठाची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या या सन्मानामुळे प्रकल्पाच्या सार्वत्रिकता आणि भविष्य-केंद्रित दृष्टीकोनावर शिक्कामोर्तब झाले आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे आर्किटेक्ट केतन जावडेकर यांनी इटलीमध्ये हा पुरस्कार स्वीकारला. विद्यापीठ परिसराच्या अत्याधुनिक मास्टर प्लॅनिंगच्या माध्यमातून अत्याधुनिक शैक्षणिक आणि संशोधन सुविधा, नवोपक्रमाना चालना देणारे प्रगत तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील प्रयोग, त्याचबरोबर शैक्षणिक, मनोरंजनात्मक, निवासी आणि वैद्यकीय सुविधा आदीच्या माध्यमातून सर्वसमावेशक सुविधा या ठिकाणी दिल्या जात आहेत.

पुढील दहा वर्षांसाठी विद्यापीठाच्या भविष्य-केंद्रित शैक्षणिक मास्टर प्लॅनला या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळाले आहे. कृषी आणि तंत्रज्ञानातील आंतरविद्याशाखीय अभ्यासाला प्राधान्य, विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणे आणि भावी नेतृत्व तयार करण्याचा उद्देश विद्यापीठाने ठेवला आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम, संशोधन केंद्रित उपक्रम, उद्योग जगताशी सहयोग आणि वाढीव आंतरराष्ट्रीय विनिमय कार्यक्रम राबवले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

“हा पुरस्कार भारतातील अग्रगण्य कृषी आणि तांत्रिक शिक्षणासाठी आमची वचनबद्धता अधोरेखित करतो. तळसंदे कॅम्पसमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. उत्कृष्ट शिक्षणासाठी जागतिक मानक तयार करण्याच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे अधिकच बळ मिळाले आहे,” असे डॉ संजय डी. पाटील यांनी सांगितले.

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, आर्किटेक्ट केतन जावडेकर आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.